fbpx
Site logo

Video : १५ Six, ९ Fours! बेन स्टोक्सच्या १८२ धावा अन् मोडला कपिल देव, व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम 

Facebook
LinkedIn
WhatsApp
Video : १५ Six, ९ Fours! बेन स्टोक्सच्या १८२ धावा अन् मोडला कपिल देव, व्हीव्ह रिचर्ड यांचा विक्रम 

Source: Lokmat Sports

ENG vs NZ Live : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडच्या वन डे संघात बेन स्टोक्सने दणक्यात पुनरागमन केले. बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध (ENG vs NZ) वन डे सामन्यात १२४ चेंडूत १८२ धावा केल्या. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर स्टोक्सने हा पराक्रम केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टोक्सने वन डे क्रिकेटच्या इतिहासात अशी खेळी खेळली जी इंग्लिश क्रिकेट कधीही विसरणार नाही. इंग्लंडची अवस्था २ बाद १३ धावी अशी होती आणि स्टोक्सने वादळी खेळी करून जेसन रॉयचा विक्रम मोडला. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रॉयच्या नावावर होता. रॉयने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावा केल्या होत्या.

वन डे  क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वोत्तम खेळी१८२- बेन स्टोक्स ( २०२३ )१८०- जेसन रॉय (२०१८)१७१- अॅलेक्स हेल्स (२०१६)१६७*- रॉबिन स्मिथ (१९९३)१६२- जोस बटलर (२०२२)

स्टोक्सने या खेळीसह सर व्हीव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. चौथ्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम रिचर्ड्स ( १८९ धावा) यांच्या नावावर होता. स्टोक्सने त्यांच्यासह एबी डिव्हिलियर्स, कपिल देव, रॉस टेलर यांनाही मागे टाकले.    

१८९ – व्हीव्ह रिचर्ड्स१८२- बेन स्टोक्स१८१- व्हीव्ह रिचर्ड्स१८१- रॉस टेलर१७६- एबी डिव्हिलियर्स१७५- कपिल देव

वन डे क्रिकेटमधील नॉन-ओपनर्सची सर्वोत्तम खेळी  चार्ल्स कॉव्हेंट्री – १९४ धावा वि. इंग्लंड व्हीव्ह रिचर्ड्स – १८९ धावा वि. इंग्लंड फॅफ ड्यू प्लेसिस – १८५ वि. ऑस्ट्रेलिया महेंद्रसिंग धोनी – १८३ वि. श्रीलंकाविराट कोहली – १८३ वि. पाकिस्तानबेन स्टोक्स – १८२ वि. न्यूझीलंड  स्टोक्सने १४ महिन्यांपूर्वी या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण २०२३ वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून स्टोक्सने पुनरागमन केले आहे. २०१९ साली इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात स्टोक्सचे मोठे योगदान होते. 

इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ १८७ धावांवरच गारद झाला. डेव्हिड मलानने ९६ आणि स्टोक्सने १८२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात ग्लेन फिलिप्सच्या ७२ धावा वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला २८ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अवघ्या 39 षटकांत संपूर्ण संघ गडगडला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३, रीस टोपलीने २, सॅम कुरनने १, मोईन अलीने १ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने ३ बळी घेतले.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: