Rishabh Pant: “एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत…”, रिषभ पंतने शेअर केला फोटो, कॅप्शननं जिंकली मनं

Facebook
LinkedIn
WhatsApp
Rishabh Pant: "एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत...", रिषभ पंतने शेअर केला फोटो, कॅप्शननं जिंकली मनं

Source: Lokmat Sports

नवी दिल्ली : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. अपघातानंतर सुरूवातीला उत्तराखंडमधील डेहराडून येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पंतवर मुंबईत उपचार सुरू होते. रिषभ पंत आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला. पंत स्वतः कार चालवत होता आणि रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. लक्षणीय बाब म्हणजे पंतची रिकव्हरी जलद गतीने सुरू आहे, या अपघातानंतर त्याने प्रथमच त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने मन जिंकणारे कॅप्शन लिहले आहे.

पंतला प्राथमिक उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंतला त्यांच्या देखरेखीखाली मुंबईला आणण्यास सांगितले. पंत जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर असल्याचे मानले जात आहे. अशातच दोन फोटो शेअर करत पंतने लिहिले, “एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले.”

खरं तर रिषभ पंतने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो काठीचा आधार घेऊन चालत आहे. पंतच्या दोन्ही पायांना अद्याप प्लास्टर केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी आधीच स्पष्ट केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट “लोकमत डॉट कॉम” 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: