ही सातवी निवडणूक – मुश्रीफ

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
सहा निवडणुका जिंकल्या ही सातवीआमदार हसन मुश्रीफ; समरजितसिंह यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाहीसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः मी सहा निवडणुका लढविल्या आहेत, ही सातवी आहे. समरजितसिंह घाटगेंच्या वक्तव्याला तितके महत्व देण्याची गरज नाही, निवडणुकीला अजून अडीच वर्षे आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना प्रत्युत्तर दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर मुश्रीफ माध्यमांशी बोलत होते.कागलमधील झोपडपट्टीच्या मालमत्ता पत्रकासंदर्भात मुश्रीफ यांनी आज बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. घाटगे यांनी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हेतर हसन मुश्रीफ यांना पराभूत करूनच जनतेतून आमदार होणार असल्याची टीका केली आहे. यावर मुश्रीफ म्हणाले,‘‘ निवडणुकीला अजून वेळ आहे. लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. लोकांचा, जनतेचा कौल मान्य राहील.’’ सत्तांतरानंतर विक्रमसिंह घाटगे तुमच्या विरोधात फारच आक्रमक झाले आहेत यावर मुश्रीफ म्हणाले, ‘‘निवडणूक लढवायला अडचण काय आहे? निवडणूक लढवायची आहे तर त्यात बोलायचे काय आहे? आता ही निवडणूक काय पहिली आहे काय? आता मी सातवी निवडणूक लढवतोय. सहा निवडणूक झाल्या. वास्तविक त्याला इतके महत्व देण्याची आवश्‍यकता नाही. अजून दोन अडीच वर्षे निवडणुकीसाठी आहेत. निवडणुकीला अजून वेळ आहे, लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. लोकशाहीत कोणी कोणत्या कामासाठी यावे हा भाग वेगळा आहे. लोकशाहीत जनतेचा कौल आपल्याला मान्य राहील.’’आमदार मुश्रीफ यांच्यासोबत असलेल्या माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, ‘‘झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाचे श्रेय घाटगे घेऊ पाहत आहेत; परंतु २०१९ ला ते एकदाच येथे बैठकीला आले होते. त्यानंतर आजतागायत ते इकडे फिरकलेलेसुद्धा नाहीत. हा सर्व पाठपुरावा आमदार मुश्रीफ यांनी केल्यामुळेच हे यश मिळाले आहे. यासह शाहू कारखान्यातील कारभारावरही टीका करण्यात आली. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, ‘‘निव्वळ स्टंटबाजी करून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी अहोरात्र झिजावे लागते. या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करीत- करीत आतापर्यंत दहा ते बारा बैठका झाल्या आहेत. आमदार मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळेच झोपडपट्टीधारकांचा हा प्रश्न कायमचा निकालात निघालेला आहे.’’

Source: Sakal Kolhapur

आधी जिल्हा परिषद लढासिद्धनेर्ली ः विरोधकांनी आधी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी. विधानसभेला अजून दोन वर्षे अवधी आहे. ते पुढे बघू. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संजय घाटगेंसोबत युतीत लढवू. आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहणार आहोत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. समरजितसिंह घाटगे यांनी काल कागलमध्ये बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात मुश्रीफांचा पराभव करून आमदार होणार, अशी जाहीर घोषणा केली होती. त्याला मुश्रीफ यांनी वंदूर येथील कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: