सांगली : कडेपूर येथे महामार्गावर कोल्ह्याचा मृत्यू

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
कडेगाव (सांगली) : कडेपूर (ता.कडेगाव) येथे कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता.1) रात्री बाराच्या सुमारास कोल्हा मृतावस्थेत नागरिकांना आढळून आला.तर प्रथम दर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.परंतु याबाबत कडेगाव-पलूस वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याने नागरीकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये कडेपूर येथे विद्युत वाहक ताराना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने दोन कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता.

Source: Sakal Kolhapur

यावेळी वनविभागाने तात्काळ दखल घेतली होती.तर प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू दिसत होता तरीही वन गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला होता. तर शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास कडेपूरहून कडेगावला येत असलेल्या युवा सेना तालुका प्रमुख राहुल चन्ने यांना येथे दौलत यादव यांच्या घरानजीक महामार्गावर कोल्हा मृतावस्थेत आढळून आला.तसेच काल शनिवारी (ता.2) सकाळी येथील इतर नागरिकांनाही येथे महामार्गावर मृतावस्थेत कोल्हा पाहिल्याचे कडेपूरचे माजी सरपंच प्रतापराव यादव यांनी सांगितले. याबाबत कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता याबाबत वन विभाग अनभिज्ञ होता.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: