Source: Sakal Kolhapur
अप्प्रवृत्तीला विरोधामुळे ‘गोकुळ’मध्ये सत्तांतरआमदार सतेज पाटील; आठ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास मोर्चाचा पुनरुच्चारसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ : जनता एका अप्प्रवृत्तीच्या विरोधात गेल्याने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाले आहे. सत्ता बदल झाल्यामुळे कदाचित ‘त्यांना’ असं वाटत असेल. राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर काहीच परिणाम होणार नाही, असे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांना उद्देशून ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तार येत्या ८ तारखेपर्यंत झाला नाही, तर मोर्चा काढावा लागणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत नंतर ते बोलत होते.आम्ही सत्ता असो किंवा नसो कायम जनतेत असतो, असे सांगून पाटील म्हणाले, ‘‘विमानतळाच्या विस्तारीकरणाला जमीन घेण्यासाठी २०० कोटींचा निधी आघाडीच्या काळात मंजूर झाला होता. धावपट्टी २३०० मीटरची करायची असेल, तर लवकर ६४ एकर जमीन ताब्यात मिळावी. त्याबाबत जमीन अधिकरण करून ताब्यात घेण्यासाठी आज बैठक झाली.’’स्थानिक स्वराज्य संस्थेतील वाढविलेले मतदारसंघ रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत २०११ पासून जनगणना झाली नाही. त्यामुळे काही ‘लॉजिक’ लावून हे मतदारसंघ वाढवले होते; पण हे जनतेच्या मनातील सरकार नाही. काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायच्या, हा हेतू सरकारचा आहे. त्यामुळे ८ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ झाले नाही, तर मोर्चा काढायला लागणार आहे.’’राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचा निधी रोखल्याबद्दल पाटील म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखणे योग्य नाही. याबाबत दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटले आहे. ही सार्वजनिक कामे आहेत, कोणाच्या स्वतःच्या फायद्याची नाहीत. समाधी स्थळाचा निधी रोखणे योग्य नाही. हे लोकशाही संपवायचे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.’’