विमानतळ बैठक – सतेज पाटील

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
४११३६

Source: Sakal Kolhapur

४११३६

भूसंपादनासह अन्य कामे पूर्ण कराआमदार सतेज पाटील; विमानतळ विस्तारीकरण कामाचा घेतला आढावासकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत. विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून सुमारे १८०० खातेदारांची ६४ एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांनी बैठकीत आढावा घेतला.विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण २३०० मीटरपर्यंत करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांचे पैसे द्यावे लागतात ते तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करा, अशा सूचना आमदार पाटील यांनी बैठकीत केल्या. उजळाईवाडी ते विमानतळ मार्गाचे चौपदरीकरण यासाठी ३० कोटीचा निधी मिळण्याकरिता तसेच उजळाईवाडी ते नेर्ली तामगाव हा रस्ता ”नवीन बाह्य वळण रस्ता” होण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही विषय मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच आपण भेट घेवून चर्चा करू, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. विमानतळ विस्तारीकरणासाठी ट्रान्समिशन, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी विविध विकासकामांचादेखील आमदार पाटील यांनी आढावा घेतला. बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: