Source: Sakal Kolhapur
सुब्रतो मुखर्जी विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धा-41113, 41114 कोल्हापूर : सुब्रतो मुखर्जी विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेते मुलींचा व मुलांचा संघ. कोल्हापूर मनपा संघाची बाजी कोल्हापूर, ता. ५ : १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटात कोल्हापूर मनपा संघाने बाजी मारली. जिल्हा क्रीडा परिषद,कोल्हापूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आयोजित विभागीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा झाली. विजयी संघांची निवड श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे १६ ते २० दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी झाली आहे. स्पर्धेत मुलांचा अंतिम सामना कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) विरूद्ध कोल्हापूर जिल्हा (दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल) यांच्यात झाला. सामन्यात मनपा संघाने ४-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. मनपाकडून देवेश सुतार, विराज पोवार, आदित्य कल्लोळी यांनी गोल नोंदवले. विजयी संघामध्ये विवेक सिंह पाटील, रेहान मुजावर, आयुष पाटील, संचित तेलंग, पार्थ पाटील, प्रेम देसाई, देवेश सुतार, देवराज जाधव, विराज पवार, आदित्य कल्लोळी, सर्वेश वाडकर, उत्कर्ष पाटील, अभयसिंह पाटील, सुरेश खावरे, आयुष राणे, संचित साळोखेप्रशिक्षक म्हणून प्रदीप साळोखे, विजय पाटील, संतोष पोवार, शरद मेढे यांनी काम पहिले. मुलींचा अंतिम सामना कोल्हापूर मनपा (विवेकानंद कॉलेज कोल्हापूर) विरुद्ध कोल्हापूर जिल्हा (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी ) यांच्यात झाला. सामन्यात मनपा संघाने ३-० गोल फरकाने हा सामना जिंकला. मनपाकडून निधा सत्तारमेकर, सानिका भोसले यांनी गोल नोंदवले. विजयी संघामध्ये मेहेक मुल्ला, सई चाळके, निधा सतारमेकर, सानिका भोसले, अनुष्का गोणी, श्रावणी कोल्हटकर, साक्षी खाडे, मुक्तांजली सावंत, श्रेया कांबळे ,अपर्णा हरेर, ऋतू पाटील, रसिका गरड, प्रणाली वंजारी, संध्या पाटील, इला बोरकर. संघ प्रशिक्षक म्हणून संतोष कुंडले यांनी काम पाहिले. पंच म्हणून गौरव माने, अवधूत गायकवाड, ऋषिकेश दाभोळे, सुमित जाधव, शहाजी शिंदे ,सुनील पवार यांनी काम पाहिले. विजयी व उपविजयी संघास मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.