महावितरणची फसवणूक

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
09978

Source: Sakal Kolhapur

09978

मीटर रीडरचाच वीज चोरीत पुढाकारग्राहकांसह दोघांवर गुन्हा; साळोखेनगरात ६४ हजारांची चोरी उघडसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ : महावितरणच्या तपासणी मोहिमेत ग्राहक व मीटर रीडर यांनी हातमिळवणी करून फसवणूक करत ६४ हजारांची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ग्राहक अजिंक्य रानगे व मीटर रीडर जगन्नाथ लेंगरे यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील साळोखेनगर भागातील एका घरगुती ग्राहकाच्या वीज मीटरच्या तपासणीत मीटरवर असलेले स्क्रोलिंग बटन फुटलेले आढळले. मीटर रीडिंग दर्शविणारा डिस्प्ले बंद पडल्याचे दिसले. वीज चोरीची शंका आल्याने मीटर पंचासमक्ष सील बंद करून पंचनामा व स्थळ तपासणी अहवाल घेतला. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मीटर चाचणी प्रयोगशाळेत मीटर तपासले असता, मीटरचा पुश बटण फोडून त्यामधून केमिकल सोडल्याचे दिसून आले. ग्राहकासमोर मीटर खोलून पाहिले असता, मीटरच्या आत पांढऱ्या रंगाचा थर जमा झाल्याचे आढळले. वीज चोरीच्या उद्देशाने मीटरचा डिस्प्ले बंद केल्याचे अहवालात स्पष्ट झाले.ग्राहकाने मीटर रीडर लेंगरे यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. लेंगरे दरमहा वीज बिल कमी येण्यासाठी ३०० ते ५०० रुपये घेत असल्याचे ग्राहक रानगे यांनी सांगितले. लेंगरे मीटर रीडर दरमहा मीटरची पेटी लॉक, घराचे गेट लॉक असल्याचे फोटो मोबाईल ॲपव्दारे अपलोड करत होते. लॉक शेरा नोंद ग्राहकांना मोबाईल ॲपव्दारे स्वत:हून मीटर रीडिंग नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध केली आहे. याकरिता ग्राहकास एसएमएस पाठविला जातो. अशा पद्धतीने मीटर रीडिंग नोंद करण्यासाठी ग्राहकास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविला जातो. मीटर रिडर लेंगरे हे ग्राहक रानगे यांच्याकडून ओटीपी घेऊन स्वत:च दरमहा ४० ते ६० युनिट नोंदवित होते. जे प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी आहे. ग्राहक व मीटर रीडर यांनी संगनमताने मीटरमध्ये छेडछाड करून गेल्या वर्षभरात ३ हजार ९८२ युनिटची म्हणजेच ६४ हजार ३६८ रुपयांची वीज चोरी करून महावितरणची आर्थिक फसवणूक केली आहे.

रीडिंगवर लक्ष केंद्रितमहावितरणकडून ग्राहकांना अचूक वीज बिले देण्याच्या हेतूने वीज मीटर रीडिंग प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यात मीटर रीडिंगचे फोटो पडताळणी करून अस्पष्ट फोटो स्वीकृती करणे बंद केले आहे. त्यासोबतच मीटर रीडरकडून घरबंद, नादुरुस्त वीज मीटर असे शेरे नोंदवून मीटर रीडिंग करत असल्याचे प्रकारांना आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जाते आहे.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: