मल्हार सेनेतर्फे गुणगौरव सोहळा

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कारकोल्हापूर : राज्य धनगर समाज महासंघप्रणित मल्हार सेना व जिल्हा धनगर समाज युवक संघटनेतर्फे १० वी व १२ वी परीक्षेत ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचा व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ७) होणार आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. समाज बांधवांनी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन रानगे यांनी केले आहे.

Source: Sakal Kolhapur

गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कारकोल्हापूर : राज्य धनगर समाज महासंघप्रणित मल्हार सेना व जिल्हा धनगर समाज युवक संघटनेतर्फे १० वी व १२ वी परीक्षेत ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचा व मान्यवरांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ७) होणार आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. समाज बांधवांनी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन रानगे यांनी केले आहे.

पर्यावरण पेपरच्या वेळेत बदलकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च/एप्रिल २०२२ मधील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू असून, सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र चारकरिता ७ ऑगस्टला होणाऱ्या पर्यावरण अभ्यास (आवश्यक) विषयाच्या वेळेत बदल केला आहे. हा पेपर दुपारी एक ते दोन ऐवजी दुपारी चार ते पाच या वेळेत होईल. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जयसिंगपुरात उद्या रणरागिणींचा सत्कारजयसिंगपूर ः हक्कासाठी लढणाऱ्या महिलांचा सन्मान रविवारी (ता. ७) केला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता रोटरी हॉलमध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजिका श्रीमती स्वाती कांबळे व श्रीमती अनिता बंडगर यांनी दिली. साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे, संभाजीपूरच्या सदस्या मनीषा पवार, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर, जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांची प्रमुख उपस्थिती आहे. ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्या मुक्ता पुजारी यांचा विशेष सत्कार होणार आहे. उपस्थित रणरागिणींचा (विधवा) खास भेट वस्तू देऊन सन्मान केला जाणार आहे. पती निधनानंतरचा संघर्ष त्या व्यक्त करणार असल्याचे रणरागिणी मांडणार आहेत.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: