Source: Sakal Kolhapur
मोहनाबाई माळवी स्मृतिदिनानिमित्त आज चार शाळांत वह्या वाटपबाजार भोगाव : श्रीमती मोहनाबाई माळवी आणि अमोल माळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या (ता. ६) बाजार भोगाव परिसरातील चार प्राथमिक शाळांत मोफत वह्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील वाळोलीचे सुपुत्र तथा ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या आई श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी यांचे गतवर्षी कोरोनाने तर पुतणे अमोल गुंडा माळवी यांचे अपघाती निधन झाले होते. दोघांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या मदतीद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी वाळोली, पोहाळे तर्फ बोरगाव, साळवाडी आणि बाजार भोगाव येथील प्राथमिक शाळांत वह्या वाटप होणार आहे.