तिरंगा-जिल्हाधिकारी प्रेस-बैठक

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
ध्वज संहितेतील सूचनांचे पालन करा---जिल्हाधिकारी राहुल रेखावार; स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेतसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सूचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करूनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना या सुचना दिल्या. तसेच बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ध्वजाची संहिता सर्वांनी पाळावी, असेही आवाहन केले.श्री. रेखावार म्हणाले, ‘‘ध्वजसंहितेतील मार्गदर्शक सूचनांनुसार झेंडे योग्य आकाराचे असल्याची खात्री तहसीलदार, गटविकास अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांनी करूनच नागरिकांना झेंडे वितरीत करावेत. नागरिकांना मोफत झेंडे देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या झेंड्यांशिवाय खासगी उत्पादक व विक्रेते यांनीही बाजारपेठेत विक्रीसाठी मुबलक प्रमाणात झेंडे उपलब्ध करून द्यावेत त्या त्या तालुल्यातील गावांमध्ये झेंड्यांचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी झेंडा वितरण केंद्र स्थापन करा. केंद्रांमध्ये जमा व वितरीत होणाऱ्या प्रत्येक झेंड्याची पाहणी करा. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. नागरिकांनी झेंडा आपल्या घरावर सरळ उभ्या पध्दतीने लावावा, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्या.’’महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. शहरात विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष ग्रामसभा, प्रभात फेरी, विधवा महिलांच्या हस्ते झेंडा वंदन, आजी-माजी सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करण्यासाठीही नियोजन करण्याचे आवाहन केले.

Source: Sakal Kolhapur

ध्वज संहितेतील सूचनांचे पालन करा—जिल्हाधिकारी राहुल रेखावार; स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेतसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सूचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करूनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना या सुचना दिल्या. तसेच बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ध्वजाची संहिता सर्वांनी पाळावी, असेही आवाहन केले.श्री. रेखावार म्हणाले, ‘‘ध्वजसंहितेतील मार्गदर्शक सूचनांनुसार झेंडे योग्य आकाराचे असल्याची खात्री तहसीलदार, गटविकास अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांनी करूनच नागरिकांना झेंडे वितरीत करावेत. नागरिकांना मोफत झेंडे देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या झेंड्यांशिवाय खासगी उत्पादक व विक्रेते यांनीही बाजारपेठेत विक्रीसाठी मुबलक प्रमाणात झेंडे उपलब्ध करून द्यावेत त्या त्या तालुल्यातील गावांमध्ये झेंड्यांचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी झेंडा वितरण केंद्र स्थापन करा. केंद्रांमध्ये जमा व वितरीत होणाऱ्या प्रत्येक झेंड्याची पाहणी करा. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. नागरिकांनी झेंडा आपल्या घरावर सरळ उभ्या पध्दतीने लावावा, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्या.’’महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. शहरात विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विशेष ग्रामसभा, प्रभात फेरी, विधवा महिलांच्या हस्ते झेंडा वंदन, आजी-माजी सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करण्यासाठीही नियोजन करण्याचे आवाहन केले.

शहरात विविध उपक्रमजिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस विभागाच्यावतीने या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच शहरासह सर्व तालुक्यांमध्ये अमृतमहोत्सवी दौड, सायकल फेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: