Source: Sakal Kolhapur
00400
तालुक्यातील शिवसैनिक हा उध्दव ठाकरेंसोबतजाधव, उगळे; नृसिंहवाडीत शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांची बैठकनृसिंहवाडी, ता. ३ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देवूनही राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गद्दारी केल्यामुळेच शिवसैनिकांनी मोर्चा काढून जाब विचारल्याचे संपर्कप्रमुख राजाराम सुतार यांनी सांगितले. ते नृसिंहवाडी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. तालुक्यातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी सांगितले.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना फोडून पक्षात बंडखोरी केली आहे. या घडामोडींबाबत शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांची नृसिंहवाडी येथील महादबा पाटील महाराज मठात बैठक झाली. यावेळी शिरोळ संपर्कप्रमुख राजाराम सुतार, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, ‘शिवसैनिकांनी गद्दारांना धडा शिकवावा.’ उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी तालुक्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यापाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगितले. माजी आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हाप्रमुख विलास उगळे, दयानंद मालवेकर, वैशाली जुगळे, संजय आणुसे, वैशाली पवार, आण्णासो बिलोरे, मंगल चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला युवासेनेचे प्रतिक धनवडे, निलेश तंवदकर, शहरप्रमुख गणेश सुतार, अभिजीत शिंदे, मंगेश पाटील, जया मंगसुळे आदी उपस्थित होते.