Source: Sakal Kolhapur
01798हुपरी : मनसेतर्फे आयोजित कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना दौलतराव पाटील. शेजारी अमर गजरे, गणेश मालवेकर आदी.———-चौकस बुद्धीने अभ्यास केल्यास यशपंकज गिरी; हुपरीत मनसे, भगवा रक्षकतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कारहुपरी, ता. ३ : कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे शालेय जीवनापासूनच जिद्द, चिकाटी, शिस्त, वक्तशिरपणा जोपासत चौकस बुद्धीने अभ्यास केला तर करिअरमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल, असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींच्या सत्कार समारंभात व्यक्त केला. शहर मनसे तसेच भगवा रक्षक संघटनेतर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या शहरातील विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ५५ विद्यार्थी विद्यार्थीनींना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून गौरवले. मनसेचे तालुकाध्यक्ष नगरसेवक दौलतराव पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ नोकरीचा विचार न करता पारंपरिक चांदी व्यवसायाबरोबरच शेती तसेच अन्य क्षेत्रात नवनविन प्रयोग राबवून वेगळे करीअर करण्याचा प्रयत्न करावा.’ विठ्ठल पाटील यांचेही भाषण झाले. मनसेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर, नगरसेवक अमर गजरे, डॉ. मिलिंद वानखेडे, पदमाकर चौगुले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष निलेश वाईंगडे, सुहास यादव आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भाऊ खाडे यांनी केले.