चंदगड तालुक्यात ३ हेक्टरवर यांत्रिकी पध्दतीने भात लागवड

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
32913कुरणी ः चंद्रकांत पाटील यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने रोप लावणीसाठी तयार करण्यात आलेला भाताचा तरवा.

Source: Sakal Kolhapur

32913कुरणी ः चंद्रकांत पाटील यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने रोप लावणीसाठी तयार करण्यात आलेला भाताचा तरवा.

चंदगड तालुक्यात तीन हेक्टरवरयांत्रिकी पद्धतीने भात लागवडकृषी विभागाचे नियोजन; आठ शेतकऱ्यांची निवडसकाळ वृत्तसेवाचंदगड, ता. ३ : तालुक्यात या वर्षी तीन हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केली जाणार आहे. तालुका कृषी विभागाने पश्चिम भागातील आठ शेतकऱ्यांची यासाठी निवड केली आहे. तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांनी ही माहिती दिली. शेतीच्या कामांसाठी मजुरांची कमतरता आणि वेळेत लागवड न झाल्याने उत्पादनावर होणारा परिणाम पाहता यांत्रिकीकरणाने रोप लागवड करणे फायद्याचे आहे. यामुळे कमी मजुरांमध्ये आणि कमी वेळेत मोठ्या क्षेत्रात रोप लावण करता येते. गतवर्षी कुरणी (ता. चंदगड) येथील चंद्रकांत पाटील यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर यांत्रिकी पद्धतीने रोप लावण करण्यात आली होती. त्याशिवाय अन्य भागातही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर यांत्रिकी रोप लावण केली होती. या वर्षी कृषी विभागाने हे क्षेत्र वाढवले आहे. विनोद मुंगारे (शिवनगे), रुक्माना गावडे (न्हावेली), प्रकाश वाळके (दाटे), संभाजी भोगुलकर (बेळेभाट), रानबा मटकर (पुंद्रा), कृष्णा रेगडे (अडकूर), दत्तू काळामवाडकर (पुंद्रा), चंद्रकांत पाटील (कुरणी) यांच्या शेतात मिळून तीन हेक्टरवर या पद्धतीने रोप लावण केली जाणार आहे.

eZy News
LATEST
>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी>>पंचगंगेची पातळी ३६ तासात वाढली १६ फूट>>निवडणूक आदेश>>आजचे कार्यक्रम- ९ ऑगस्ट>>यूजीसी निर्णय
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: