काळसेकर पुरस्कार वितरण

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
९९८५

Source: Sakal Kolhapur

९९८५

लिंगभेदाचे राजकारण नाहीसे करण्याची गरज प्रा. अविनाश सप्रे; वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर पुरस्कारकोल्हापूर, ता. ३ : मानवमुक्तीचा स्वर मोठा होण्यासाठी साहित्यातील आणि समाजातील लिंगभेदाचे राजकारण नाहीसे करण्याची तीव्र गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार २०२२ व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार २०२२ सोहळ्यात ते बोलत होते. प्रा. सप्रे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर दिशा पिंकी शेख यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार दिला. अनुक्रमे २१ हजार रुपये व दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला.प्रा. सप्रे म्हणाले, ‘‘मी कवी आहे, म्हणून मी आहे,’ असे म्हणणारा ओतप्रोत कवी माणूस म्हणजे डहाके आहेत. साठोत्तरी कालखंडातली मराठीतील श्रेष्ठ दर्जाची कविता त्यांची आहे. त्याचप्रमाणे घडणाऱ्या-बिघडणाऱ्या वर्तमानाचे दर्शन घडविणारीही त्यांची कविता आहे. मूलभूत तात्त्विकतेची मांडणी करणारा सर्जनशील कादंबरीकार आणि चिंतनशील ललितलेखकही ते आहेत. मराठी साहित्याकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देणारे विचारवंतही ते आहेत. साहित्यातील सृजनाच्या अनेकविध शक्यता लक्षात घेऊन व्यक्त होणारा सर्वव्यापी, श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणून त्यांनी मराठीत त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. दिशा पिंकी शेख या तर भोवतालातील सारी कुरूपता अधोरेखित करणाऱ्या कवी आहेत.’’श्री. डहाके म्हणाले, ‘‘सतीश काळसेकर यांच्या नावे पुरस्कार मिळण्याचा हा क्षण एकाच वेळी आनंददायी आणि वेदनादायकही असल्याचे बोलून दाखविले. सतीश काळसेकर यांनी थोडकीच पण लक्षवेधी, चिरस्मरणीय कविता लिहिली. त्याचप्रमाणे कवितेची दखल घ्यावयास लावणारी समीक्षाही त्यांनी लिहिली.’’दिशा पिंकी शेख म्हणाल्या, ‘‘आमच्या लेखण्यांना सामर्थ्य देण्याचे काम विद्यापीठांनी आणि शिक्षण व्यवस्थेने करावे. विषमतेचे डोस आपण मुलांना लहानपणापासून देतो. आपल्यातला बंधू-भगिनीभाव आता मित्रत्वाच्या, समतेच्या पातळीवर आणण्याची गरज आहे. जेव्हा पोट भरलेलं असते, तेव्हाच पावसातल्या मातीचा सुगंध घ्यावासा वाटत असतो.’’मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुरस्काराच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट केली. मानसी काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. सुप्रिया काळसेकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रभा गणोरकर, डॉ. उदय नारकर, डॉ. माया पंडित, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, तनुजा शिपूरकर उपस्थित होते.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: