कागल मधील श्रेयवाद

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
लीडकागलमधील कुरणे वसाहतीसह अन्य झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा नेत्यांचा श्रेयवाद आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दुपारी जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुरणे वसाहतीतील झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टी कार्डवर शिक्कामोर्तब केले. एकंदरतीच झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डवरून मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा श्रेयवाद रंगला

Source: Sakal Kolhapur

लीडकागलमधील कुरणे वसाहतीसह अन्य झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा नेत्यांचा श्रेयवाद आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दुपारी जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुरणे वसाहतीतील झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टी कार्डवर शिक्कामोर्तब केले. एकंदरतीच झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डवरून मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा श्रेयवाद रंगला

४११३७कागलमधील ५४ झोपड्या नियमितआमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यशकोल्हापूर, ता. ५ ः कागलमधील कुरणे वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ५४ झोपड्यांच्या नियमितीकरणावर शिक्कामोर्तब झाले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना झोपडपट्टीधारकांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे, झोपडपट्टी नियमितीकरणाच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागलच्या मुख्याधिकारी टीना गवळी, कागलच्या भूमी अभिलेख उपाधीक्षक सुवर्णा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. प्रांताधिकारी, मुख्याधिकारी आणि भूमि अभिलेखच्या उपाधीक्षक या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या झोपडपट्टी नियमितीकरण समितीने आज या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.कागल- मुरगूड मार्गावरील वड्डवाडी येथील कुरणे वसाहतीमध्ये झोपड्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. नियमितीकरणामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या उभारलेल्या ५४ झोपडपट्टीधारकांना याचा लाभ झाला आहे. यावेळी राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाईन वसाहत, स्मशानभूमी लाईन वसाहत, सांगाव नाका मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत या इतर झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही आमदार मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना दिल्या.केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगरसेवक सतीश घाटगे, नगरसेवक नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगर अभियंता सुनील माळी, नगरपालिका अधिकारी सुनील केंजळे, सचिन भोसले, भरत सोनटक्के व इतर झोपडपट्टी धारक उपस्थित होते.

४११३८

कागलमधील सात कॉलनीत प्रॉपर्टी कार्ड समरजितसिंह घाटगे; जिल्हाधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक कोल्हापूर, ता. ५ ः कागलमधील कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामुळे रेंगाळलेल्या कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे, कागलमधील बरीच वर्षे रेंगाळत असलेल्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी कार्यवाही करावी, असे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासमवेत कुरणे वसाहत व इतर सात कॉलनी संदर्भात आज बैठक बोलावली होती. बैठकीत आम्ही जो पाठपुरावा केला होता त्यानुसार कुरणे वसाहती मधील ५४ घराचे प्रॉपर्टी कार्ड काढण्याचा आदेश त्यांनी दिला. वड्डवाडी वसाहत, राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाईन वसाहत, स्मशानभूमी लाईन वसाहत, सांगाव नाका मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत या सात वसाहतींचे प्रस्ताव व अहवाल तातडीने पाठवण्याबाबत चर्चा झाली. जेणेकरून बऱ्याच वर्षांपासून प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित असणाऱ्या या नागरिकांना लवकरात लवकर स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड मिळतील. प्रॉपर्टी कार्ड अभावी या लोकांची होणारी कुचंबणानाही त्यामुळे दूर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावरील तातडीने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: