Source: Sakal Kolhapur
एसटी महामंडळाचा सर्व्हर डाऊनज्येष्ठांसह विद्यार्थ्यांना फटका; विद्यार्थी पाससाठी स्वतंत्र सोय
सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः ज्येष्ठ नागरिकांसह विविध योजनांचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळातर्फे पास देण्यात येतात मात्र एसटीचा सर्व्हरडाऊन असल्याने पास देण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना मात्र ‘मॅन्युअली’ पास देण्याची सेवा सुरू आहे.एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात पन्नास टक्के सवलत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल नंबर नोंदवून पास देण्याची सुविधा आहे. असा पास देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. ज्येष्ठ नागरिक नवीन पास काढण्यासाठी तसेच नूतनीकरण करून घेण्यासाठी बसस्थानकात येत आहेत मात्र सर्व्हर डाऊन असल्याचे कारण बहुतांशी बसस्थानकात सांगितले जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नवीन पास मिळत नाही. अशात जे ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात त्यांनी आधार कार्डावरील वय ६५ वर्षांवरील दाखवल्यास सवलतींचा लाभ काही वाहक जरूर देतात मात्र ज्यांचे वय कमी दिसते अशा व्यक्तींजवळ पास नसेल तर मात्र काही डेंपोचे वाहक सवलत देण्यास नकार देतात, असाही संमिश्र अनुभव आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने पास काढतात मात्र त्यांनाही सर्व्हरडाऊनचा फटका बसला त्याची दखल घेत महामंडळाच्या काही बसस्थानकात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून पास देण्याचे काम सुरू केले आहे.
नागरिकांचे हेल्पाटेसर्व्हर डाऊनचा विषय एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून तांत्रिक दुरूस्ती सुरू आहे मात्र हा तांत्रिक बिघाड केव्हा दूर होईल याचे उत्तर स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने प्रवाशांना पास सुविधेसाठी हेलपाटे मारावे लागत आहे.