इंग्लंडच्या डॉ. सायमन यांची आपत्ती व्यवस्थापन

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
41139

Source: Sakal Kolhapur

41139

कोल्हापूरचे आपत्ती व्यवस्थापन इंग्लंडमध्ये—इंग्लंडच्या डॉ. सायमन यांनी दिली आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली भेटसकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः कोल्हापूरचा आपत्ती व्यवस्थापन लोकल टू ग्लोबल असल्याचा प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला. इंग्लंडमधील डिसाईड विद्यापीठात यंदापासून ‘एम.एस्सी. इन डिजास्टर मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. त्यात कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश होईल. विद्यापीठाचे अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. सायमन यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. इंग्लंडच्या डिसाईड विद्यापीठासह आशियाई देशातील, भारतातील तीन विद्यापीठांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमही होईल. या विद्यापीठातील विद्यार्थी एक सेमिस्टर भारतात, तर भारतीय विद्यापीठातील विद्यार्थी एक सेमिस्टर इंग्लंडमध्ये शिकणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सन २०१९ च्या पूर परिस्थितीनंतर अकस्मात इंग्लंडमधील डिसाईड विद्यापीठाच्या डॉ. सायमन आणि त्यांच्या टीमने येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. येथील कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या विद्यापीठांत आपत्ती व्यवस्थापन विषयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आज डॉ. सायमन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर सखोल चर्चा केली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर कार्यरत स्वयंसेवकांशीही चर्चा केली.कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणारे समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पसरविता येईल, या अनुषंगाने त्यांच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वसमावेशक बाबी समाविष्ट करण्यात येतील, असेही डॉ. सायमन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रेखावार यांनीही या अनुषंगाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपत्ती व्यवस्थापन विषयात नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: