अतिरिक्‍त शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करा

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
41125

Source: Sakal Kolhapur

41125

अतिरिक्‍त शिक्षकांना अन्यत्र नेमणूक द्याशहर-जिल्हा नागरी कृती समिती; शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना निवेदनसकाळ वृत्तसेवाकोल्‍हापूर, ता. ५ : शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षकांची संख्या अधिक आहे. जेथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तेथे शिक्षक कमी आहेत. त्यामुळे बसून पगार घेणाऱ्या शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याकडे केली.शहरातील एका शिक्षण संस्‍थेत १ ली ते ७ वीचे वर्ग भरवण्यात येतात. तेथे रेकॉर्डवर ५६ पटसंख्या असली तरी प्रत्यक्षात ११ विद्यार्थी शाळेत असतात. या ठिकाणी खोटी पटसंख्या नोंदवली असण्याची शक्यता आहे. या शाळेत १३ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षकाला किमान ९० हजार ते १ लाख रुपये पगार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला महिन्याला १ लाख रुपये शासन आणि जनतेच्या निधीतून खर्च करत आहे. एका विद्यार्थ्यांवर एवढा खर्च अन्य कोणत्याही देशात होत नसेल तो कोल्‍हापुरात होत आहे. ही हास्यस्‍पद बाब असली तरी ती वस्‍तुस्‍थिती आहे.जिल्‍ह्यात अशा अनेक शाळा असण्याची शक्यता आहे. तेथे खातरजमा करून ते शिक्षक पुरेशी विद्यार्थी संख्या आहे, जिथे शिक्षकांची गरज आहे, तेथे अतिरिक्‍त शिक्षकांना नेमणूक द्यावी, अशी मागणी शिष्‍टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. तसेच शहरातील ज्या शाळेत ११ विद्यार्थी आहेत त्यांना इतर शेजारील शाळेत प्रवेश देवून, तेथील शिक्षकांना अन्य शाळात नेमणूक दयावी, अशी मागणी यावेळी केले. यावर अतिरिक्‍त शिक्षकांना इतर शाळेत समायोजन करण्याचा प्रस्ताव त्वरित पाठवू देण्याची ग्वाही प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे चंद्रकांत सूर्यवंशी, शंकराव शेळके, विनोद डुणूंग, सी. एम. गायकवाड, महेश जाधव, कादर मलबारी, महादेव जाधव, रमेश मोरे, अशोक पवार, भाऊ घोडके, गणेश शिंदे उपस्‍थित होते.

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: