Source: Lokmat News
राजाराम लोंढेकाेल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने सर्वसाधारण सभेपुढे पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोगील खुर्दपासून वडकशिवाले, उजळाईवाडीपर्यंतची १४, वाळवा तालुक्यातील येलूरसह १३ व हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी ते अतिग्रेपर्यंतची १४, पन्हाळा तालुक्यातील एक अशा ४२ गावांचा समावेश होणार आहे.त्याचबरोबर उमेदवारीसह सूचक, अनुमोदकांचा निवडणुकीच्या लगतच्या पाचपैकी चार वर्षात पिकवलेला सगळ्या उसाचा पुरवठा करणे बंधनकारक राहणार आहे. सत्तारूढ माजी आमदार अमल महाडिक यांनी पोटनियम दुरुस्तीच्या आडून आमदार सतेज पाटील यांना चेकमेट देण्यास सुरुवात केली आहे.‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला; चार-पाच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील झुंज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पाटील यांनी सगळी ताकद पणास लावून सत्तांतरासाठी प्रयत्न केले. मात्र राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत व राज्यातील सत्तेच्या ताकदीवर माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांनी सर्व शक्तीनिशी त्यांचे हल्ले परतावून लावत कारखान्याच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या.हे जरी खरे असले तरी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या तपासणीमध्ये सत्तारूढ गटाचे १२७२ सभासद अपात्र ठरल्याने कारखान्याची पुढची निवडणूक महाडिक यांच्या दृष्टीने जड जाणार हे निश्चित होते. हे ओळखून महाडिक यांनी त्यांची हुकमत असलेल्या वाळवा तालुक्यातील येलूरसह १३ गावे, करवीरमध्ये १४, तर हातकणंगलेमधील १४ गावांचा समावेश करून पकड घट्ट केली आहे. तीन वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्यांचे सभासदत्व आपोआप रद्द होणार असल्याने विरोधी गटाची कोंडी होणार आहे. २९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत पोटनियम मंजुरीसाठी ठेवला असून, यावर वादळी चर्चा होणार हे निश्चित आहे.आठ तालुक्यांचे कार्यक्षेत्र‘राजाराम’चे कार्यक्षेत्र राधानगरी, करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी व हातकणंगले असे सात तालुक्यांचे होते. त्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याची भर पडणार आहे.शिरोली, मुडशिंगी गटात एक जागा वाढणारशिरोली पुलाची, मुडशिंगी या गट क्रमांक ४ मध्ये एक जागा वाढणार आहे. संस्था प्रतिनिधी गट रद्द केल्याने येथे तीनऐवजी चार जागा होणार आहेत.पोटनियम दुरुस्तीतील महत्त्वाचे मुद्दे :पिकवलेला ऊस सलग तीन वर्षे कारखान्याला न पाठवल्या व तीन सभांना गैरहजर राहिल्यास सभासदत्व रद्द.संस्था प्रतिनिधी गट रद्द, त्यांना ‘अ’ वर्ग गटातील उमेदवारांना मतदान करता येणार; पण निवडणुकीस उभे राहता येणार नाही.उमेदवार व त्यांच्या सूचक, अनुमोदकाने पाचपैकी चार वर्षे ऊस पुरवठा व सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे बंधनकारक.उमेदवार इतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळात असू नये. @media screen and (min-width:769px){ #inArticle3.inarticleAd{margin:10px auto; width:300px; height:250px; background:#f3f3f3; text-align:center;} } @media screen and (max-width:768px){ #adFly-MainWrapper{display:flex; overflow:hidden; position:relative; -webkit-box-pack:center; -webkit-justify-content:center; -ms-flex-pack:center; justify-content:center; } #adFly-MainWrapper.ad300 {height:600px; width:100%; margin:15px auto; } #adFly-MainWrapper .flyad-innercontainer { position:absolute!important; top:0!important; left:0!important; width:100%!important; height:100%!important; border:0!important; margin:0!important; padding:0!important; clip:rect(0,auto,auto,0)!important; -webkit-clip-path:polygon(0px 0px,100% 0px,100% 100%,0px 100%)!important; clip-path:polygon(0px 0px,100% 0px,100% 100%,0px 100%)!important; } #adFly-MainWrapper .flyad-box { position:fixed!important; top:0!important; width:100%; height:100%; -webkit-transform:translateZ(0)!important; display:-webkit-box; display:-ms-flexbox; display:flex; -webkit-box-orient:vertical; -webkit-box-direction:normal; -ms-flex-direction:column; flex-direction:column; -webkit-box-align:center; -ms-flex-align:center; align-items:center; -webkit-box-pack:center; -ms-flex-pack:center; justify-content:center; } .actualAd300{width:320px; height:600px; display:flex; justify-content:center; align-items:center;} .advert-image {position:relative; width:100%; height:100%; display:block;} } पोटनियम दुरुस्तीची कारणे :१८.५ मेगावॉटचा सहवीज प्रकल्प उभारणी व कारखाना मशिनरी आधुनिकरणामुळे उसाची गरज.वाळव्यासह इतर गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसपुरवठा करण्याची इच्छा.भागभांडवलात वाढ झाल्याने कारखाना सक्षम होणार.ही गावे वाढणार :वाळवा : तांदूळवाडी, कोरेगाव, मालेवाडी, कुंडलवाडी, येलूर, फारणेवाडी, शिगाव, इटकरे, कासेगाव, भरतवाडी, बहाद्दूरवाडी, ढवळी, बागणी.करवीर : कोगील खुर्द, कोगील बुद्रूक, नेर्ली, तामगाव, हलसवडे, दऱ्याचे वडगाव, नंदगाव, नागाव, वडकशिवाले, चुये, कावणे, इस्पुर्ली, जैत्याळ, उजळाईवाडी.हातकणंगले : कासारवाडी, अंबपवाडी, अंबप, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ वडगाव, चावरे, निलेवाडी, पारगाव, तळसंदे, घुणकी, किणी, बुवाचे वाठार, अतिग्रे.पन्हाळा : वाघवे