कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती ही कोल्हापूरच्या सर्व स्तरातील लोकांनी न्याय व हक्क विधायकते साठी आमचे नेते जिल्ह्याचे वडीलकीचे नेतृत्व स्व.खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब, स्व. कॉम्रेड गोविंदराव पानसरे (अण्णा) यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि नागरी प्रश्नांची निर्गत व उन्नतीसाठी व विकासासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सामाजिक न्याय मिळवण्यासाठी आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यरत असून..
♦ शालेय शिक्षणाचे कंपनीकरण करणारा कायदा शासनास रद्द करण्यास लावून कोल्हापूर जिल्ह्यातील बंद केलेल्या 33 शाळा चालू करण्यास शासनास भाग पाडून यश मिळवणारे विरोधी आंदोलन
♦ पर्यायी शिवाजी पुलाचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचा प्रश्न
♦ शिवाजी विद्यापीठ व शिवाजी पुतळा चौक परिसर सुशोभीकरणाचा प्रश्न
♦ शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव व क्रीडांगण दुरुस्तीचा प्रश्न
♦ शिवाजी विद्यापीठात खेळाडूंवर झालेला अन्याय व खेळाडूंना शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रश्न
♦ देशाला दिशा देणाऱ्या टोलविरोधी आंदोलनाच्या नियोजनांमधील सक्रिय सहभाग
♦ शहरातील खराब रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधींकडून त्वरित निधी उपलब्ध करून रस्ते दुरुस्तीचा प्रश्न
♦ शहरातील मिळकतींवर असणारा बी ट्युनर प्रश्न
♦ शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न
♦ कोल्हापूर क्षेत्रातील रेडझोन चा प्रश्न
♦ महापालिका उद्यान विभागातील अनागोंदी कारभार
♦ लॉकडाउन मुळे निर्माण झालेला शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा प्रश्न
♦ मनपा शाळांचा पट वाढणे आणि शाळांना भौतिक सुविधा प्राप्त होणे साठी प्रयत्न
आणिसध्या चालू असलेल्या घरफाळा घोटाळ्याचा प्रश्न. इत्यादी अनेक लहान-मोठे प्रश्न सोडविण्याचा लोकसहभागातून प्रयत्न केलेला आहे हे करीत असताना शहर विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करून प्रसंगी लोकप्रतिनिधींकडे विकास कामांसाठी निधी च्या मागणीचा आग्रह करून जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केलेली आहे अशाप्रकारे आपली ही नागरी कृती समिती कार्यरत आहे.
[popup_anything id="118852"]