“IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे…”, पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

Facebook
LinkedIn
WhatsApp
"IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

Source: Lokmat Sports

IPL and PSL, Saim Ayub । नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा युवा खेळाडू सॅम अयुबने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल असा प्रश्न विचारला असता त्याने सॅम अयुबने म्हटले, “विराट कोहलीमुळे आरसीबीच्या संघाकडून खेळायला मला आवडेल. विराटने ज्याप्रकारे त्याचे करिअर बनवले आहे ते साहजिकच प्रेरणादायी आहे.”

सॅम अयुब पाकिस्तानी संघाचा युवा फलंदाज आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमच्या पेशावर झाल्मीच्या संघाचा भाग आहे. मात्र, त्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघातून फारसे सामने खेळले नाहीत. त्याने एकूण ३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ६६ धावा केल्या आहेत. अलीकडेच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. 

“विराट कोहली जगातील सर्वात मोठ्या ॲथलीटपैकी एक आहे”पाकिस्तानाती युट्यूबर नादिर अलीच्या पॉडकास्टवर बोलताना अयुबने विराटचे तोंडभरून कौतुक केले. सॅम अयुबने आयपीएलबद्दल म्हटले, “मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास आरसीबीकडून खेळायला आवडेल, कारण विराट कोहली त्या संघाचा हिस्सा आहे. विराटने ज्या प्रकारे त्याचे करिअर बनवले आहे, तो युवा खेळाडूंसाठी आदर्श बनला असून मी त्याचा मोठा चाहता आहे. तो जगातील सर्वात मोठ्या ॲथलीटपैकी एक आहे पण त्याला ज्याप्रकारे हाताळले जाते ते महत्त्वाचे आहे.” 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट “लोकमत डॉट कॉम” 

 

Marathi News
LATEST
>>समस्त मुस्लीम समाज>>इचल : महापालिका पाचवा क्रमांक>>दिव्यांग संस्था>>मालमत्ता ताब्यात न घेतल्यास कारवाई>>थेट पाईप>>विद्यार्थ्यांनी जाणून घेतली अकरावीची प्रवेश प्रक्रिया>>जल जीवनच्या तक्रारीची चौकशी सुरु>>कागल : मंडलिक कारखाना बिनविरोध, अधिकृत घोषणा १३ जून नंतर>>एसटी कॉंग्रेस>>माझी वसुंधरा अभियानात मलकापूर पालिका राज्यात ४थी .>>जिल्‍हा परिषदेत स्‍वराज्य गुढी>>कायदा मोडला की कारवाई होणार ः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत.>>पळापळी, तणाव>>दरोड्याच्या पार्शभूमीवर सीसीटीव्हीचा आढावा -महेंद्र पंडीत>>औद्योगिक स्वच्छतेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना सन्मानित करणार ; एमआयडीसी अधीक्षक सुधीर नागे>>सलोखा कायम ठेवूया>>केएमएतर्फे कॅन्सर जनजागृती कार्यक्रम>>कसबा सांगाव: रणदेवीवाडी येथे शासन आपल्या दारी उपक्रम>>चौकट बंदी आदेश>>व्यापारी न्यायालय शिक्षा
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: