Source: Pudhari Kolhapur
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई मंदिरात प्रतिष्ठापना होणार्या महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणरायाचे सोमवारी (दि.१८) थाटात आगमन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता बँड पथक, ढोल-ताशाच्या गजरात पापाची तिकटी येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. मंगळवारी (दि.१९) सकाळी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, तर रात्री 8 वाजता दैनिक पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती होणार आहे.
संबंधित बातम्या :
महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने गेली 132 वर्षे श्री गणेशाची अंबाबाई मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदाचे 133 वे वर्षे असून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गरुड मंडपाची डागडुजी सुरू असल्याने यंदा या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना देवस्थान समितीसमोर मंडप उभारून करण्यात येणार आहे. याठिकाणीही गणेश मंडप उभारण्यात आला असून याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मालोजीराजे, भैया माने, महेश जाधव, आदील फरास, प्रा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. 25 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत.
मंगळवारी गणेश चतुर्थी दिवशीची पहिली आरती दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते रात्री आठ वाजता होणार आहे. भाविकांनी गणेशोत्सव काळात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी यांनी केले.
हेही वाचा :