fbpx
Site logo

G20 मध्ये राष्ट्रपतींच्या मेजवाणीत मुंबईचा ‘हा’ पदार्थ; स्वीटमध्ये ‘स्वर्णकलश मिठाई’

Facebook
LinkedIn
WhatsApp
मेजावाणीचं मेन्यू कार्ड आता सोशल मीडियातून समोर आलं आहे. त्यामध्ये, मुंबईच्या पावालाही स्थान मिळालंय. 

Source: Lokmat National

नवी दिल्ली – जी२० परिषदेसाठी देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांचा कुंभमेळाच जमला आहे. आजपासून दोन दिवसीय जी20 शिखर परिषदेला सुरुवात झाली असून अनेक महत्त्वाचे करार या परिषदेत होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या G20 शिखर परिषदत सहभागी झाले होते. आता, या राष्ट्रप्रमुखांसाठी रात्रीच्या जेवणात खास, चविष्ट अन् स्वाचिष्ट पदार्थ असणार आहेत. या मेजावाणीचं मेन्यू कार्ड आता सोशल मीडियातून समोर आलं आहे. त्यामध्ये, मुंबईच्या पावालाही स्थान मिळालंय. 

जी-20 नेत्यांसाठी बाजरीशी संबंधित पदार्थांसह भारतीय भोजन तयार करण्याचा निर्णय केवळ भारताचा समृद्ध पाककृती वारसाच दर्शवत नाही, तर तो शिखर परिषदेची एकता आणि सामायिक भविष्याच्या विषयाशीही सुसंगत आहे. या शिखर परिषदेचा विषय वसुधैव कुटुंबकम, असा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे २० देशांच्या प्रमुखांना जेवणाचं खास निमंत्रण आहे. त्यासाठी, स्पेशल शाकाहारी बेत असून रुचकर पदार्थांची मेजवाणी असणार आहे. भारत मंडपमच्या लेव्हल ३ वर या डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. 

राष्ट्रपतींच्या निमंत्रणातील जेवणाचे मेन्यू

स्टार्टर

पात्रम ‘ताजी हवा का झोंका’दही गोळा आणि भारतीय मसालेदार चटनींनी सजलेलं कंगनी श्रीअन्न (मिलेट), लीफ क्रिस्प (दूध, गहू आणि खवा युक्त) 

मेन कोर्स

वनवर्णम ‘मातीचे गुणविशेष’

ग्लेजड कॉरेस्ट मशरूम, कुटकी श्रीअन्न (मिलेट) क्रिस्प आणि करी पत्त्यांसोबत तैयार केरळ काट तांदुळाने परतलेले कटहल गॅलेट (दूध व गहू युक्त)

इंडियन ब्रेड्स

मुंबई पावकलौंजीचे स्वादिष्ट मुलायम बन (दूध आणि गहू युक्त)बाकरखानीइलायचीच्या स्वादाची गोड चपाती 

मिष्ठान

मधुरिमा ‘स्वर्ण कलश’इलायचीचा सुगंध असलेला सांवाचा हलवा, अंजीर-आडू मुरब्बा आणि अंबेमोहर राइस क्रिस्प्स (दूध व श्रीअन्न, गहू आणि मेवा युक्त) 

पेय पदार्थ

कश्मीरी कहवा, फिल्टर कॉफी आणि दार्जलिंग चहापानाच्या चविचे चॉकलेट पत्ते 

दरम्यान, राष्ट्रपती भवनमध्ये १८० जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वच विदेशी पाहुणे, केंद्रीयमंत्री आणि इतर प्रमुखांना निमंत्रण आहे. विशेष म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमधील २५०० स्टाफने हा जेवणाचा मेन्यू तयार केला आहे. जेवणावेळी मोठ्या स्क्रीनवर भारत वाद्य दर्शनम म्हणजेच Musical Journey of Bharat चे प्रदर्शन असणार आहे.  

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: