fbpx
Site logo
eZy 360 Tour

मंडळाचे मनोगत

या वर्षी श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळातर्फे भव्य प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत नेहमीच वेगळेपण जपलेल्या या मंडळाने भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षानिमित्त खास गणेश विसर्जन रथ तसेच भारतीय ३ रंगांमध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे.

त्याचबरोबर या वर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या परपंपरिक गणेश उत्सव स्पर्धेमध्ये या मंडळाने सहभाग नोंदवला आहे.

तरी सर्व गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे मंडळातर्फे आवाहन करणेत आले आहे.

गणेश मूर्ती विशेष

१) श्रींची  मूर्ती  फूट उंचीची असून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शाडूची करण्यात येते .

२) मूर्तीमध्ये कधीही बदल केला जात नाही .

३) 'नवसाला पावणारा गणपती', अशी भाविकांची 'श्री संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपतीवर श्रद्धा आहे .

४) भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोने-चांदी अलंकार 25 लाख रुपये किमतीचे आहेत .

मंडळाची वैशिष्ट्ये

🙏 श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या श्री गणेश उत्सवाची वैशिष्ट्ये 🙏

भाविकांनी श्री गणेशास वाहिलेली नारळाची तोरणे ट्रक भरून जमतात सदर नारळांचे अनंतचतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टी पूर्वी प्रसाद म्हणून मोफत वाटप रेस कोर्स नाका ते कोळेकर तिकटी पर्यंत व संभाजीनगर परिसरामध्ये केले जाते .

श्री गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी मिरवणुकीमध्ये शहरातील भाविक भक्तिभावाने पाणी वाहून श्रीगणेशाची पूजा करतात .

श्रींची आरती मान्यवरांच्याहस्ते रोज रात्री ठीक वाजता केली जाते मान्यवर वेळेवर उपस्थित न राहिल्यास आरतीच्या वेळेस बदल केला जात नाही आरतीसाठी हजारो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित असतो .

भाविक रांग लावून दर्शन घेतात अशी कोल्हापुरातील ही एकमेवश्री गणेश मूर्ती आहे, उत्सव काळामध्ये फक्त भक्ती गीत एच ऐकवली जातात. विविध भाव भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला जातो .

हत्ती, घोडे, उंट , पारंपारिक वाद्य, धनगरी ढोल, झांज पथक,मंडळाची लेझीम पथक, असा लवाजम्यासह पारंपारिक पद्धतीने सर्वात प्रथम अति भव्य मिरवणूक काढण्याचा मान छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ कडे जातो शिस्तबद्द मिरवणुकीसाठी कैसा व जनसेवा दल यांच्या मार्फत विविध पारितोषिक मिळालेली आहेत .🐘🐎🐪🥁🎷🎺🎊🎉

मंडळातर्फे दरवर्षी उत्सव काळात श्रीगणेशाची पोस्टर्स मोफत दिली जातात मिरवणुकीमध्ये संभाजीनगर ते पंचगंगा तालीम पर्यंत अखंडपणे प्रसाद वाटप केला जातो श्री गणेशांची आकर्षक पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी असते .

संपूर्ण परिसर हा पूर्णपणे सी,सी,टी,व्ही नियंत्रणाखाली आहे . 

महिलांची सुरक्षा , गर्दीचे व्यवस्थापन , गैरवर्तणूक या सर्व गोष्टी लक्षात घेता मंडळ स्वखर्चाने सेक्युरिटी गार्ड तैनात करते .

 

व्हिडीओ
मंडळाचा इतिहास

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 झाली . स्थापनेपासूनच 'सार्वजनिक श्री गणेशोत्सव' साजरा करण्यात येत आहे . १९६० मंडळाची सहकारी तत्त्वावरील चालणारे मंडळ अशी नोंदणी झाली . मंडळाच्या इमारतीमध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे . १९८१ सालापासून संभाजीनगर चौकामध्ये श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला . 

नम्र निवेदन:
Shri Chatrapati Sambhajinagar Tarun Mandal च्या या उपक्रमास आपण आपले अभिप्राय (Comments) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
  • vinay bhongade
    September 5, 2023 at 1:48 pm

    VERY GOOD

  • Jitendra kadam
    September 7, 2022 at 4:39 pm

    नवसाला पावणारा गणपती

  • Shailesh S
    September 17, 2021 at 9:26 pm

    Chhan

  • Vishal
    October 7, 2019 at 12:45 pm

    Khup chan

  • Chetan
    September 9, 2019 at 9:53 pm

    खुपच छान ✌✌👌👌

  • Suresh Patil
    September 8, 2019 at 7:18 pm

    गणेश मुर्ती ही पूर्ण शाडूच्या माती पासुन बनवलेली कोल्हापूर मधील ऐकमेव सार्वजनिक मुर्ती आहे

  • Vijay
    September 8, 2019 at 7:16 pm

    परंपरे बरोबरच पर्यावरण पूरक तसेच सामाजिक बांधिलकी जपत साजरा होणारा गणेशोत्सव

  • Amar Bagal
    September 8, 2019 at 7:14 pm

    कोल्हापूर मधिल एकमेव मंडळ जिथे गणेशोत्सवाची परीपुर्ण व्याख्या कळते.

  • Deepak
    September 8, 2019 at 7:10 pm

    अतिशय धार्मिक वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव कुठेही गोंधळ गडबड नाही अत्यंत शांततेत

Add a review
Contact Details
  • श्री अजित बाबासो सासणे
  • ९९७५१६२१६३