fbpx
Site logo
eZy 360 Tour

गणेश मूर्ती विशेष

पुलगल्ली तालीम मंडळ हे 21 फुटी गणेश मुर्ती स्थापन करणारे प्रसिद्ध मंडळ आहे यावर्षी देखील तालीमीने 21 फुटी मूषकासन रूपातील आकर्षक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे

मंडळाचे मनोगत

पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच लोकांचे कमी-अधिक प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे यंदाचा होणारा आपला पारंपारिक गणेशोत्सव साजरा करावा की नाही हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे पण आपल्या परंपरेला तडा न जाऊ देता हा उत्सव कमीत कमी खर्चात फक्त 'श्रीं 'च्या मूर्तीची प्रतिष्ठापना व नित्य पूजा याव्यतिरिक्त अन्य कोणतेही मोठे कार्यक्रम न करता यावर्षीचा गणेशोत्सव आपण अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे

तसेच गणेशोत्सवावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो या उत्सवावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत त्यांचा देखील विचार करून गणेशोत्सव हा पारंपारिक पद्धतीने करून त्यांच्यावरील येणारे आर्थिक संकट आपण थोड्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत

मंडळाची वैशिष्ट्ये

पुलगल्ली तालमीचे वैशिष्ट म्हणजे गेली तीस वर्षे झाले विविध रूपातील 21 फुटी गणेश मूर्तीची स्थापना करणारी ही एकमेव तालीम आहे यामध्ये आम्ही सर्वप्रथम नारळापासून (नारळाचा गणपती) बनवलेली 21 फुटी गणेशमूर्ती केली होती त्यापासून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या रूपातील वेगवेगळ्या वस्तू पासून 21 फुटी गणेशमूर्ती बनवल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सुपारी पासून बनवलेली (सुपारीचा गणपती) काचे पासून बनवलेला (काचेचा गणपती) त्याच बरोबर नागाचा गणपती, अष्‍टमुखी, विश्वकर्मा, बळीराजा, बाळा जो जो रे, शांतिदूत, विराट विष्णूरूप, बारा राशीचा, विष्णू दशावतार, अर्धनारी नटेश्वर, हत्ती वरचा गणपती, लालबागचा राजा, राजहंसारूढ गणपती, विश्वरूपी गणेश अशा बऱ्याच प्रकारच्या गणेश मूर्तीची स्थापना आमच्या तालमीने केली आहे गणेश उत्सवा बरोबरच तालमीमध्ये मोहरम हा सण देखील तितक्याच उत्साहात केला जातो तालमीमध्ये हजरत नंगीवली बाबा व वल्लीसाहेब पीर यांचे देवस्थान आहे त्यामुळे तालमीमध्ये गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही उत्सव मोठ्या प्रमाणावर पार पाडले जातात यामधूनच आम्ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवतो त्याचबरोबर शिवजयंती देखील केली जाते नवरात्र उत्सव काळात देखिल अनेक छोटे-मोठे कार्यक्रम तालमीच्या वतीने घेण्यात येतात नवरात्र उत्सवात तालमीच्या वतीने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी आई तुळजाभवानी यांच्या पालखीचे स्वागत देखील अत्यंत उत्साहात केले जाते त्याचबरोबर दत्तजयंतीला येणाऱ्या दत्ताच्या पालखीचे देखील स्वागत तालमीच्या वतीने केली जाते

मंडळाचा इतिहास

पुलगल्ली तालीम मंडळ कोल्हापुरातील प्रसिद्ध तालीम आहे पुलगल्ली तालमीची स्थापना सन 1896 मध्ये झाली असून सध्या 2019 मध्ये तालमीचे 123 वे वर्ष चालू आहे आमची तालीम कोल्हापुरात रविवार पेठेत उमा टॉकीज जवळ मध्यवर्ती भागात आहे तसेच पूर्वी तालमीमध्ये कुस्तीचा आखाडा सुद्धा होता

नम्र निवेदन:
PULLGALLI TALIM MANDAL च्या या उपक्रमास आपण आपले अभिप्राय (Comments) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
 • Nilesh B GAIKWAD
  September 4, 2022 at 10:56 pm

  ❤🙏

 • Krishnaprasad Anil Gaikwad
  September 4, 2022 at 10:33 pm

  Morya

 • Ankit Kate
  September 4, 2022 at 10:29 pm

  गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏

 • Tejas kawade
  September 4, 2022 at 10:23 pm

  गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

 • Vaibhav Bhosale
  September 4, 2019 at 2:16 pm

  🙏🚩 गणपती बाप्पा मोरया🚩🙏

 • Shubham.yadav
  September 4, 2019 at 1:40 pm

  Ganpati Bappa Morayaa 🙏🏻🙏🏻

 • Vaibhav Nikam
  September 4, 2019 at 1:39 pm

  गणपती बाप्पा मोरया

 • Prasad lohar
  September 4, 2019 at 1:37 pm

  Moryaa

 • Siddharth Molake
  September 4, 2019 at 11:56 am

  मोरया…

Add a review
Contact Details
 • Siddharth Molake
 • 8446193636
 • 8390325590