loader image
२०१९ च्या पुरग्रस्तांना मदतीचा हात !

आपण सर्वांना माहित आहेच कि आपला गणेशोत्सव सन 2003 पासून कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता साजरा केला जातो. भाविकांनी स्वखुशीने दिलेल्या देणगी मधून हा भव्य उत्सव साजरा केला जातो. शिल्लक निधीमधून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. देणगीसाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे आवाहन केले जात नाही . पण यावर्षी महापुराने आलेल्या आपत्ती चा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे.  उत्सव खर्च कमी करून या वर्षी जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांना करावयाचा संकल्प आहे यासाठी पूरग्रस्तांना एक मदतीचा हात म्हणून आपण गणेशोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करूया . 

गणेश मूर्ती विशेष

१) श्रींची  मूर्ती  फूट उंचीची असून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शाडूची करण्यात येते .

२) मूर्तीमध्ये कधीही बदल केला जात नाही .

३) 'नवसाला पावणारा गणपती', अशी भाविकांची 'श्री संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपतीवर श्रद्धा आहे .

४) भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोने-चांदी अलंकार 25 लाख रुपये किमतीचे आहेत .

मंडळाची वैशिष्ट्ये

🙏 श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या श्री गणेश उत्सवाची वैशिष्ट्ये 🙏

भाविकांनी श्री गणेशास वाहिलेली नारळाची तोरणे ट्रक भरून जमतात सदर नारळांचे अनंतचतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टी पूर्वी प्रसाद म्हणून मोफत वाटप रेस कोर्स नाका ते कोळेकर तिकटी पर्यंत व संभाजीनगर परिसरामध्ये केले जाते .

श्री गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी मिरवणुकीमध्ये शहरातील भाविक भक्तिभावाने पाणी वाहून श्रीगणेशाची पूजा करतात .

श्रींची आरती मान्यवरांच्याहस्ते रोज रात्री ठीक वाजता केली जाते मान्यवर वेळेवर उपस्थित न राहिल्यास आरतीच्या वेळेस बदल केला जात नाही आरतीसाठी हजारो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित असतो .

भाविक रांग लावून दर्शन घेतात अशी कोल्हापुरातील ही एकमेवश्री गणेश मूर्ती आहे, उत्सव काळामध्ये फक्त भक्ती गीत एच ऐकवली जातात. विविध भाव भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला जातो .

हत्ती, घोडे, उंट , पारंपारिक वाद्य, धनगरी ढोल, झांज पथक,मंडळाची लेझीम पथक, असा लवाजम्यासह पारंपारिक पद्धतीने सर्वात प्रथम अति भव्य मिरवणूक काढण्याचा मान छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ कडे जातो शिस्तबद्द मिरवणुकीसाठी कैसा व जनसेवा दल यांच्या मार्फत विविध पारितोषिक मिळालेली आहेत .🐘🐎🐪🥁🎷🎺🎊🎉

मंडळातर्फे दरवर्षी उत्सव काळात श्रीगणेशाची पोस्टर्स मोफत दिली जातात मिरवणुकीमध्ये संभाजीनगर ते पंचगंगा तालीम पर्यंत अखंडपणे प्रसाद वाटप केला जातो श्री गणेशांची आकर्षक पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी असते .

संपूर्ण परिसर हा पूर्णपणे सी,सी,टी,व्ही नियंत्रणाखाली आहे . 

महिलांची सुरक्षा , गर्दीचे व्यवस्थापन , गैरवर्तणूक या सर्व गोष्टी लक्षात घेता मंडळ स्वखर्चाने सेक्युरिटी गार्ड तैनात करते .

 

व्हिडीओ
मंडळाचा इतिहास

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 झाली . स्थापनेपासूनच 'सार्वजनिक श्री गणेशोत्सव' साजरा करण्यात येत आहे . १९६० मंडळाची सहकारी तत्त्वावरील चालणारे मंडळ अशी नोंदणी झाली . मंडळाच्या इमारतीमध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे . १९८१ सालापासून संभाजीनगर चौकामध्ये श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला . 

नम्र निवेदन
आम्ही आमची माहिती www.eZyKolhapur.com च्या या पेजवर वेळोवेळी update करतो. तरी आपण सर्वाना विनंती आहे की या Shri Chatrapati Sambhajinagar Tarun Mandal च्या या नवीन उपक्रमास आपण आपले Comments (अभिप्राय) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
 • Vishal
  October 7, 2019 at 12:45 pm

  Khup chan

 • Chetan
  September 9, 2019 at 9:53 pm

  खुपच छान ✌✌👌👌

 • Suresh Patil
  September 8, 2019 at 7:18 pm

  गणेश मुर्ती ही पूर्ण शाडूच्या माती पासुन बनवलेली कोल्हापूर मधील ऐकमेव सार्वजनिक मुर्ती आहे

 • Vijay
  September 8, 2019 at 7:16 pm

  परंपरे बरोबरच पर्यावरण पूरक तसेच सामाजिक बांधिलकी जपत साजरा होणारा गणेशोत्सव

 • Amar Bagal
  September 8, 2019 at 7:14 pm

  कोल्हापूर मधिल एकमेव मंडळ जिथे गणेशोत्सवाची परीपुर्ण व्याख्या कळते.

 • Deepak
  September 8, 2019 at 7:10 pm

  अतिशय धार्मिक वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव कुठेही गोंधळ गडबड नाही अत्यंत शांततेत

 • seva
  September 8, 2019 at 6:53 pm

  कोल्हापूर मधील गणेश उत्सवाची परंपरा दाखवणारे एकमेव गणेश मंडळ.

chat
Add a review
मुख्य समिती (Core Committee)
अध्यक्ष / President - श्री अजित बाबासो सासणे
उपाध्यक्ष / Vice President - श्री नेताजी केशव शिंदे
सचिव / Secretary - श्री विजय यशवंत घाटगे
खजिनदार / Treasury Head - श्री किशोर नरहर यादव
Contact Details
 • श्री अजित बाबासो सासणे

 • ९९७५१६२१६३

Map Location