loader image
मंडळाची वैशिष्ट्ये

काँटी मित्र मंडळ

मंडळाचा इतिहास

*कौंटी मित्र मंडळ, भोईगल्ली, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर*

 

१९७५ आणि १९७९ असा सलग दोनवेळचा क्रिकेट विश्वचषक जिंकून वेस्ट इंडीजच्या तगड्या आणि दणकट संघाने क्रिकेट जगतात दबदबा निर्माण केला होता. १९८३ साली विश्वचषक जिंकून हॕटट्रीक साधायची असा मनसुबा आखून वेस्ट इंडीजचा संघ स्पर्धेत उतरला खरा, पण कपिलदेवच्या नेतृत्वाखालील जिगरबाज संघाने अंतिम सामन्यात कमी धावसंख्या असताना देखील वेस्ट इंडीजच्या चारी मुंड्या चित केले आणि विश्ववचषकावर आश्चर्यकारकरित्या आपले नाव कोरले. यानंतरच्या काळात संपूर्ण भारतभर जल्लोष आणि क्रिकेटचा ज्वर पसरला होता. इंग्रजांनी ज्या क्रिकेटला जन्म दिला त्यांच्या देशात स्थानिक पातळीवर खेळले जाणारे क्रिकेटचे सामने हे अत्यंत व्यावसायिक स्वरुपाचे होते. या सामन्यांचे वेड आणि चुरस ही जगजाहीर होती. भारतात ज्याप्रमाणे रणजी सामन्यांचं महत्त्व आहे तितकंच महत्त्व इंग्लंडच्या या स्थानिक सामन्यांना म्हणजेच कौंटी सामन्यांना आहे. भारतात ज्याप्रमाणे प्रत्येक राज्याचा किंवा भौगोलिक विभागाचा एक रणजी संघ असतो त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये प्रत्येक कौंटीचा एक संघ असतो व या संघातून देशी तसेच परदेशी खेळाडू खेळतात. साधारणतः भौगोलिक संरचना, स्थानिक प्रशासन आणि राजकीय जडणघडण या निकषांच्या आधारे इंग्लंडमध्ये विविध कौंटींची आखणी करण्यात आली आहे. याच गोष्टीचा संदर्भ पकडून कौंटी क्रिकेट क्लब स्थापण्यात आला. २५ डिसेंबर १९८४ रोजी क्रिकेटच्या वेडापायी एकत्र आलेल्या भोईगल्ली, लक्ष्मीपुरी येथील तरुणांनी कौंटी क्रिकेट क्लब (कौंटी मित्र मंडळ) या नावाने मंडळ स्थापन केले. टेनिस बॉल क्रिकेटच्या झंझावातात मंडळाची स्थापना झाली. अमुक अमुक तालीम मंडळ, अमुक अमुक तरुण मंडळ यांच्या कोल्हापूरातील भाऊगर्दीत कौंटी हे नाव लोकांच्या तोंडात बसायला थोडा वेळ लागला. कौंटी क्रिकेट क्लबच्या स्थापनेवेळेस महादेव थोरवत, अमोल शिंदे, नितीन यादव, सचिन यादव, निवास-विनोद-विजू शिंदे बंधू, राकेश भोसले, अविनाश माळी, किरण बोडके, अनिल मोहिते, नाताळ कदम, ईशान-अँथोनी, अजित-अभिजीत कुईगडे, राजू वंजारी, मनोज तेलवेकर, अय्याज मणेर, राजू तेलवेकर, सागर काशिद हे कार्यकर्ते होते. यातील जवळपास सर्वचजण पट्टीचे क्रिकेटपटू! ८० च्या दशकात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कौंटीचा दबदबा निर्माण झाला. मंडळाच्या प्रथम वर्षातील गणेशमूर्ती ही 'क्रिकेट खेळणारा गणेश' या स्वरुपातील होती. साधारण दीड फूट उंचीचा आणि सोनेरी रंगाचा हातात बॕट पकडलेला गणेश खूपच रेखीव होता. मंडपाच्या मध्यभागी ही मूर्ती आणि सभोवतीच्या मंडपाला कार्यकर्त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली क्रिकेट मैदानाची सजावट. गणेशोत्सवादरम्यान आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. यात शेंगदाण्यापासून बनवलेला गणेश, गोट्यांपासून बनवलेला श्रीगणेश, साईबाबा-तिरुपती अशा रूपातील मूर्ती होत्या. गणेशोत्सवात विविध ऐतिहासिक, सामाजिक विषयांवर सजीव देखावे ही देखील कौंटी मित्र मंडळाची खासियत. कौंटी चे सजीव देखावे हे प्रेक्षकांमध्ये हास्याची लकेर सोडून समाज प्रबोधन करतात. गणेशोत्सवात जमलेल्या वर्गणीचा काही हिस्सा हा समाजकार्यासाठी वापरला जातो. त्यातून बालकल्याण संकुल, इंदूमतीदेवी वसतिगृह या ठिकाणी मदत देण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. मंडळाचे काही सदस्य हे केएसए (कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन) मार्फत भरवल्या जाणाऱ्या स्थानिक फुटबॉल स्पर्धातून खेळलेले आहेत. मंडळातर्फे दरवर्षी घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली जाते. लहान मुलांमध्ये विविध कलाकौशल्य रुजली जावीत यासाठी मंडळातर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशा या विविध उपक्रमांद्वारे या मंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. गत २५ डिसेंबरला मंडळाचे यशस्वी ३५ व्या वर्षात पदार्पण झाले, याचे औचित्य साधून मंडळातर्फे गरजू शालेय वसतिगृहाला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक, ऐतिहासिक, क्रीडा क्षेत्रातील वसा जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

नम्र निवेदन
आम्ही आमची माहिती www.eZyKolhapur.com च्या या पेजवर वेळोवेळी update करतो. तरी आपण सर्वाना विनंती आहे की या County Mitra mandal च्या या नवीन उपक्रमास आपण आपले Comments (अभिप्राय) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
mood_bad
 • No comments yet.
 • Add a review
  Contact Details
  • Sanket powar

  • 8855878788

  • 7744041440

  Cart Item Removed. Undo Have a coupon ?
  • No products in the cart.