DDLJ: ‘जा..सिमरन जा..’; मुंबईतील ‘या’ स्टेशनवर शूट झालाय सिनेमातील आयकॉनिक सीन

Facebook
LinkedIn
WhatsApp
DDLJ: या चित्रपटाच्या कथानकासह, त्यातील गाणी, डायलॉग्सही सुपरहिट झाले. यात खासकरुन शाहरुख आणि काजोलचा ट्रेनमागे धावण्याचा सीन तर तुफान गाजला.

Source: Lokmat Manoranjan

बॉलिवूडमधील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (dilwale dulhania le jayenge). १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट झाला. इतकंच नाही तर आजही त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या कथानकासह, त्यातील गाणी, डायलॉग्सही सुपरहिट झाले. यात खासकरुन शाहरुख आणि काजोलचा ट्रेनमागे धावण्याचा सीन तर तुफान गाजला. विशेष म्हणजे हा सीन चक्क मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर शूट झाला आहे. 

आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातील शाहरुख-काजोलचा रेल्वेचा सीन शूट करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. या सीनसाठी काजोलला अथक प्रयत्न करावे लागले होते. हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं. तसंच हा सीन करताना कोणत्या अडचणी आल्या तेदेखील सांगितलं.आम्ही केलेला ट्रेनचा सीन सोपा नव्हता. या सीनसाठी आम्हाला १०० पेक्षा जास्त रिटेक घ्यावे लागले. कडक उन्हात रेल्वे ट्रॅकव दर २० मिनिटांनी धावणे अत्यंत कठीण होतं. त्यात चेहऱ्यावरील अभिनयही कायम ठेवायचा होता. ट्रेनच्या वाऱ्यामुळे सतत माझे केस विस्कटत होते, असं काजोल म्हणाली.

कुठे शूट झालाय काजोल-शाहरुखचा ट्रेनचा सीन

‘जा सिमरन जा…जी ले अपनी जिंदगी’ या अमरीश पुरींच्या डायलॉगनंतर राजला भेटण्यासाठी सिमरन ट्रेनच्या मागे धावते. आणि, राजही आपला हात पुढे करत सिमरनला ट्रेनमध्ये खेचून घेतो. विशेष म्हणजे सुपरहिट ठरलेला हा सीन मुंबईतील आपटा रेल्वे स्टेशनवर शूट झाला होता. या सीनसाठी तीन दिवस शुटिंग करावं लागलं होतं.

दरम्यान, १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ४ कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने भारतात ८९ कोटींची कमाई केली. तर विदेशात १३ कोटींची कमाई केली होती.  

Marathi News
LATEST
>>जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश>>कागल तालुका क्रिकेट असोसिएशन चा विजय>>जागतिक दुग्धदिन>>सीईओंनी रोखली जलजीवांची चौकशी>>विद्यापीठाच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी चा पेपर फुटला>>माशांवर प्रदुषणाचा परिणाम भाग १>>बांधकाम कायमस्वरूपी बंद करा>>दलित पँथरतर्फे प्रांतांना निवेदन>>बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर>>मुख्याधिकारी मुल्लाणी यांची तडकाफडकी बदली>>पोलीस एकत्रित>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: