Archives

CoronaVirus Lockdown : रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने शुक्रवारपासून आयोजित रक्तदान शिबिरास चित्रपट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ५० पिशव्या रक्ताचे संकलन झाले असून, शनिवारीदेखील हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. ती ओळखून कोल्हापुरातील मराठी चित्रपट व्यावसायिकांनी राजारामपुरी सातवी गल्ली येथील जीवनधारा ब्लड बँक येथे शुक्रवारी व शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

पहिल्या दिवशी अभिनेते आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, विकास पाटील, अजय कुरणे, संजय मोहिते, मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव, अमर मोरे, सर्जेराव पाटील, देवेंद्र चौगुले यांच्यासह ५० चित्रपट व्यावसायिकांनी रक्तदान केले.

 

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a comment
    eZy Kolhapur

    FREE
    VIEW