Archives

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरातील चित्रीकरणासाठी चित्रपट महामंडळाचा पाठिंबाच

कोल्हापूर : मुंबई-पुण्यातील ठप्प झालेले मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा नेहमी पाठिंबाच राहिला आहे. मात्र, या अनुषंगाने कोल्हापुर विरुद्ध पुणे-मुंबई असा वाद उकरून काढून काहीजण स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महामंडळ सगळ्यांचे असून त्याच्या एकसंधतेला तडा जाणार नाही, असे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने प्रसिद्ध केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक बैठकीत चित्रपट व्यावसायिक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी महामंडळाच्या अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याविषयी सांगितले नाही. कोल्हापूर, पुणे, मुंबई हा प्रादेशिक वाद महामंडळाने केला नाही. पण कोल्हापुरातील मूठभर मंडळी हा प्रयत्न करत आहेत.

कोल्हापुरातील व्यावसायिकांनी येथे चित्रीकरणासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यानंतर महामंडळाने पाठिंबा दर्शविला होता. तसेच पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे चित्रीकरणाची परवानगी मागितली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कोल्हापुरात चित्रीकरणास परवानगीचा विचार करावा ही मागणी केली. तसेच येथील चित्रीकरणासाठी झालेली तयारी लक्षात घेत परिसरातील कलावंत, तंत्रज्ञांना त्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन केले असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

 

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a comment
    eZy Kolhapur

    FREE
    VIEW