Archives

CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यासाठी दिलासादायक ; १६३८ अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढतच असताना बुधवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत १२९५ आणि आज सकाळी १० वाजेपर्यंत ३४३ असे एकूण १६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पीटलसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय गोडावत हॉस्टेल, अ‍ॅपल हॉस्पीटल आणि आधार हॉस्पीटल या एकूण १८ ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते.

काल रात्री ८.३० पर्यंत प्राप्त झालेल्या १३३८ अहवालांपैकी १२९५ तर आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ३४६ अहवालांपैकी ३४३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे.

 

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a comment
    eZy Kolhapur

    FREE
    VIEW