fbpx
Site logo

Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताचं ‘आव्हान’ वाढलं; कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री

Facebook
LinkedIn
WhatsApp
Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताचं 'आव्हान' वाढलं; कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री

Source: Lokmat Sports

ind vs sl live match । कोलंबो : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघाने विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारून ‘आशियाई किंग्ज’ श्रीलंकेने फायनलचे तिकिट मिळवले. आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच श्रीलंकेच्या खेळपट्टीवर आव्हानाचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले जाते. याचा प्रत्यय देखील आशिया चषकात पाहायला मिळाला. खरं तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

दरम्यान, भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब उंचावला आहे, तर श्रीलंकेने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. गतवर्षी पाकिस्तानला पराभूत करून यजमान श्रीलंकेने दासुन शनाकाच्या नेतृत्वात ही किमया साधली होती. त्यामुळे आज आशियातील दोन यशस्वी संघ पुन्हा एकदा ‘आशियाई किंग्ज’ कोण हे सिद्ध करण्यासाठी भिडत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारताने २०१८ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात वन डे फॉरमॅटचा आशिया चषक जिंकला होता. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ – दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, दुशन हेमांथा, प्रमोद मधुशन, मथिक्ष्णा पथिराना.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: