Source: Sakal Kolhapur
नेसरी, ता. ४ : तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील जवान मसणू ऊर्फ अभिजित धोंडिबा मणगुतकर (वय २८) यांचे काल (ता. ३) दुपारी नेसरी-आजरा मार्गावर किणे गावाजवळील झाडाला कार आदळून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला होता. आज दुपारी त्यांच्यावर तावरेवाडी गावातील गायरानमध्ये शासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्टरीचे अधिकारी नायक सुभेदार चांद पिरा बेग यांच्यासह फ्यूनरल गार्डचे १७ जवान, कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ओनरारी कॅप्टन अशोक पवार व सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील संघटक नामदेव पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके , सहा पोलीस निरीक्षक दिवसे आदींनी शासकीय मानवंदना दिली.
यानंतर वडील धोंडीबा मनगुतकर यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. जवान मनगुतकर हे कालच विशाखापट्टनंमहून आपल्या गावी सुट्टीवर आले होते. बुधवारी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तावरेवाडी सरपंच पूजा वळतकर, नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर, उपसरपंच श्रीकांत मनगुतकर,
अजितसिंह शिंदे नेसरीकर, भैय्यासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, विद्याधर गुरबे, विस्तार अधिकारी राज दड्डीकर, मंडळ अधिकारी संजय राजगोळे, पोलिस पाटील तानाजी म्हातूकडे, माजी सरपंच दिनकर वळतकर, ग्रामसेविका एस. एस. पद्माकर, भरमू जाधव, कॅप्टन रवींद्र मंडलिक, संभाजी मनगुतकर, लक्ष्मण पाटील, वसंत गवेकर, बाबू बसाण उपस्थित होते.