fbpx
Site logo

’15 मसुदे, 200 तास चर्चा, 300 बैठका’, असा बनला G20 जाहीरनामा; विरोधकांनीही केले कौतुक

Facebook
LinkedIn
WhatsApp
G-20 New Delhi: भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त जाहीरनाम्यावर एकमत झाले.

Source: Lokmat National

G-20 New Delhi: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे. राजधानी दिल्लीत आयोजित G20 बैठकीची सर्वत्र चर्चा होत आहे. या ऐतिहासिक शिखर परिषदेची विशेष बाब म्हणजे सर्व देशांच्या सहमतीनंतर पहिल्याच दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. कोणतीही परिषद तेव्हाच यशस्वी मानली जाते, जेव्हा जाहीरनामा जारी केला जातो आणि या G20 जाहीरनाम्याची खास गोष्ट म्हणजे, त्यावर 100 टक्के एकमत होते. रशिया-युक्रेन युद्धाची किंवा चीनचा यावर काहीही परिणाम पडला नाही. 

‘नवी दिल्ली जाहीरनामा’वर सर्वांचे एकमत होण्यासाठी पडद्यामागे बरीच मेहनत घेण्यात आली. भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी हा जाहीरनामा कसा तयार करण्यात आला हे सांगितले.

200 तास चर्चाG20 मधील चर्चेपासून व्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी अमिताभ कांत यांच्यावर होती आणि त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांना केवळ पंतप्रधानांकडूनच नव्हे तर विरोधी पक्षांच्या सदस्यांकडूनही प्रशंसा मिळाली. अमिताभ कांत म्हणाले की, G20 शिखर परिषदेत एकमत झालेल्या जाहीरनामा तयार करण्यासाठी भारतीय मुत्सद्दींच्या चमूला 200 तासांहून अधिक काळ चर्चा कराव्या लागल्या. G20 चा सर्वात मोठा आणि महत्वाचा गुंतागुंतीचा भाग म्हणजे भू-राजकीय परिच्छेद (रशिया-युक्रेन) वर एकमत निर्माण करणे होता. 200 तासांच्या नॉन-स्टॉप चर्चा, 300 द्विपक्षीय बैठका, 15 मसुदे यानंतर, जाहिरनामा तयार करण्यात आला.

या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

संयुक्त सचिव एनम गंभीर आणि के नागराज नायडू यांच्यासह राजनयिकांच्या पथकाने 300 द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी करारावर पोहोचण्यासाठी वादग्रस्त युक्रेन संघर्षावर त्यांच्या समकक्षांसह 15 मसुदे वितरित केले. कांत यांनी सांगितले की, नायडू आणि गंभीर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना खूप मदत झाली. ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया सारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी या यशापर्यंत पोहोचण्यात आघाडीची भूमिका बजावली.

G20 नेत्यांच्या घोषणेमध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा उल्लेख टाळण्यात आला आणि सर्व राज्यांनी एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याच्या तत्त्वाचे पालन करण्याचे सर्वसाधारण आवाहन केले. “आम्ही सर्व देशांना प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता आणि स्थिरतेचे रक्षण करणारी बहुपक्षीय प्रणाली, यासह आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे समर्थन करण्याचे आवाहन करतो,” असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

काँग्रेसने कौतुक केलेकाँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये G20 नेत्यांच्या संयुक्त संभाषणावर एकमत निर्माण केल्याबद्दल G20 शेर्पा अमिताभ कांत यांचे कौतुक केले. थरुर यांनी X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर म्हटले की, “G20 मध्ये भारतासाठी हा “गर्वाचा क्षण” आहे. खुप छान अमिताभ कांत! G20 मध्ये भारतासाठी अभिमानाचा क्षण!”

पीएम मोदींनीही कौतुक केलेकेरळ केडरचे 1980-बॅचचे आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांनी यापूर्वी नीती आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहे. जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आमच्या टीमच्या कठोर परिश्रमाने आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने नवी दिल्ली G20 शिखर परिषदेच्या जाहिरनाम्यावर सहमती झाली आहे. मी आमचे मंत्री, शेर्पा आणि सर्व अधिकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांनी हे सार्थक करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत आणि म्हणूनच ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत.”

 

 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: