वडणगेत शेकडो नळ कनेक्शन्स अनधिकृत; सर्वेक्षणात माहिती उघड

Facebook
LinkedIn
WhatsApp
वडणगे : पुढारी वृत्तसेवा वडणगे (ता.करवीर) येथे शंभरहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन्स आढळली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या नळ जोडण्यांची ग्रामपंचायतकडे नोंदच नाही, शिवाय हे अनधिकृत नळधारक ग्रामपंचायतीत एक रुपयाही पाणीपट्टी न भरता फुकट पाण्याचा वापर करीत आहेत. प्रामाणिक नागरीक वेळेत घरफाळा व पाणीपट्टी भरत असताना, या फुकट्या नळ जोडण्याची संख्या कोणाच्या आशीर्वादाने वाढली? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Source: Pudhari Kolhapur

वडणगे : पुढारी वृत्तसेवा वडणगे (ता.करवीर) येथे शंभरहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन्स आढळली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या नळ जोडण्यांची ग्रामपंचायतकडे नोंदच नाही, शिवाय हे अनधिकृत नळधारक ग्रामपंचायतीत एक रुपयाही पाणीपट्टी न भरता फुकट पाण्याचा वापर करीत आहेत. प्रामाणिक नागरीक वेळेत घरफाळा व पाणीपट्टी भरत असताना, या फुकट्या नळ जोडण्याची संख्या कोणाच्या आशीर्वादाने वाढली? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

वडणगे ग्रामपंचायतकडून गावातील मिळकती व नळ कनेक्शन्सचा सर्वे सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतीने काही खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या सर्वेक्षणात आज अखेर सुमारे ६०० मिळकतींच्या भेटीनंतर शंभर नळ कनेक्शन्स अनधिकृत आढळली आहेत. वडणगेमध्ये ग्रामपंचायतकडे अधिकृत नोंद असलेले साडेतीन हजारहून अधिक मिळकत धारक आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत अनधिकृत नळ जोडण्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही अनधिकृत नळ कनेक्शन्स अनेक वर्षांपासूनची असून, हे नळधारक फुकट पाणी वापरत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडला आहे. ग्रामपंचायतीचे वसुली कर्मचारी सुद्धा अशा अनधिकृत नळ कनेक्शनकडे कानाडोळा करून वसुलीसाठी दरवेळी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांकडेच जातात.

अशीच अवस्था येथील मिळकतीची सुद्धा आहे. वडणगे गाव कोल्हापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने गेल्या चार वर्षात गावचा विस्तार होऊन प्रचंड वेगाने नागरीकरण झाले आहे. दहा ते बारा कॉलन्या येथे नव्याने तयार झाल्या आहेत. मात्र अनेक मिळकतींची ग्रामपंचायतकडे अद्याप नोंदच झालेली नाही. कर वाचवण्यासाठी अनेकांनी मिळकत नोंद करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ही या नवीन मिळकती नोंद करण्यास तत्परता दाखवलेली नाही. आता सर्वेक्षणानंतर या मिळकतींची ग्रामपंचायतकडे नोंद होईल अशी अपेक्षा आहे.

१) वडणगे येथे गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या शेकडोच्या घरात गेली आहे. तत्कालीन काही ग्रामपंचायत सदस्य व काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने या फुकट्या नळ जोडण्याच्या संख्येत वाढच झाली आहे.’ मी हाय घे तू चावी’ असे सांगून अनेकांनी अनधिकृत कनेक्शन्स दिली आहेत. यात काही कर्मचाऱ्यांचाही हात असल्याची चर्चा आहे.

२) ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ

वडणगे गावची लोकसंख्या वीस हजारहून अधिक आहे. येथील मिळकत धारक व नळ कनेक्शन यांची ग्रामपंचायत प्रशासनाकडे सद्या नोंद असलेली अधिकृत माहिती मागितली असता, प्रशासनाने ही माहिती दिली नाही. प्रशासनाकडून माहिती लपवली जात आहे.

हेही वाचा : 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: