लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Nana Patole: राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Source: Lokmat Maharashtra

मुंबई – लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लम्पी आजारामुळे राज्यातील पशुमालक चिंतेत आहेत. सरकार लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगत आहे तरीही रोगाची लागण कमी होताना दिसत नाही. मागील पंधरा दिवसात ७ हजार पशुंचा लम्पी रोगामुळे मृत्यू झाला असून लागण झालेल्या पशुंचा आकडाही अजून लाखात असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत लम्पी रोगामुळे राज्यातील तब्बल २४ हजार पशुधनांचा मृत्यू झाला आहे. १०० टक्के लसीकरण झाले असेल तर ह्या लसी लम्पी रोगाची लागण रोखण्यात प्रभावी नाहीत का? लम्पी रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुमालकांना राज्य सरकार आर्थिक मदत देत आहे पण यातून प्रश्न सुटत नाही. लम्पी रोग नियंत्रणावर मिळवण्यात राज्य सरकारचे फारसे लक्ष नाही, असे यातून दिसते.

लम्पी रोगामुळे केवळ गोवंशीय पशुधन त्यातच देशी गाईंचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. लम्पी रोगामुळे दुग्धव्यवसायावरही परिणाम होत असून दुग्ध संकलन घटल्याचे दिसत आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, वेळीच लसीरकरण केले तर लम्पीपासून जनावरांना धोका संभवत नाही असे सरकार म्हणत आहे. राज्यात मोफत लसीकरण झाल्याचा सरकारचा दावा आहे असे असतानाही रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात सरकारी उपाययोजना कमी पडत आहेत. पशुधन हे लाखामोलाच असून ते टिकवले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

eZy News
LATEST
>>विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार>>महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी>>पुलाची शिरोली येथे ऊस तोडणी मशिनमध्ये अडकून वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू>>बांधकाम कामगार चौकशी>>कोट>>ग्रामपंचायत अर्ज माघार>>जे.एफ.पाटील खा. मंडलिक प्रतिक्रिया>>गॅस्ट्रोसदृश आजाराने वृद्धेचा मृत्यू>>लीड>>बाजार समिती निवडणूक>>आजरा ः बिबट्याच्या हल्यात पाडा ठार>>दत्तभक्तासाठी नाष्टा वाटप>>पंचगंगेत काळेकुट्ट पाणी दुर्गंधी>>आर.के.पोवार, साळोखेंच्यात वाद>>राधानगरी राजकीय>>हूकुमनामा नोंदणे बंधनकारक नाही>>सुधारित करवीर वार्तापत्र>>सुधारित कागलात सव्वीस पैकी अठरा ठिकाणी सरपंच पदासाठी थेट दुरंगी लढत : तालुक्यात मुश्रीफ-संजय घाटगे गटाच्या विरोधात मंडलिक- राजे युती>>पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य आणि शिवसेनेतच लढत>>आजरा ः ग्रामपंचायत वार्तापत्र
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: