Source: Sakal Kolhapur
05234
खासबाग मैदानाची प्रशासकांकडून पाहणीकोल्हापूर, ता. २६ : महापालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी खासबाग मैदानाची पाहणी केली. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने राजर्षी छत्रपती शाहू स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त पुरुष व महिलांसाठी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. राजर्षी छत्रपती शाहू खासबाग कुस्ती मैदानातील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी मैदानात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. नियोजनाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.उपायुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. महादेवराव आडगुळे, संभाजी पाटील, अशोक पोवार, अंजली जाधव, विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर आदी उपस्थित होते.
महिलांसाठीचे गट वाढविलेमहिला गटात ३६, ४०, ४५ किलो वजन गटांचा आज समावेश करण्यात आला. त्यातील प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे; तर इतर क्रमांकाची मिळून बक्षिसांची एकूण रक्कम ५४ हजारांची झाली.