Source: Sakal Kolhapur
अपघातग्रस्तांना १०८ ची सेवा मिळण्यास दिरंगाईअतुल मंडपे ः सकाळ वृत्तसेवाहातकणंगले, ता. ३ ः आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांबरोबरच रुग्णांना तातडीची आरोग्यसेवा मिळावी यासाठी ‘१०८’ ही सेवा सुरू केली. बहुतेक वेळा अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.अपघातांचे वाढते प्रमाण, रुग्णांची होणारी हेळसांड लक्षांत घेउन अशा रुग्णांना वेळेत वैद्यकिय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने १०८ या रुग्णसेवेची सुरूवात केली. त्याचे कंत्राट बीव्हीजी ग्रुपला दिले. त्यांच्याकडून जिल्ह्यासाठी ३६ तर महाराष्ट्रभर सुमारे १२०० वाहने कार्यरत आहेत. आपत्कालीन समयी १०८ ला संपर्क साधल्यास तो कॉल सुरुवातीला पुणे येथील मुख्यालयात जोडला जातो. तेथून जीपीएस प्रणालीद्वारे घटनांस्थळापासून जवळच्या गाडीच्या शोध घेऊन त्या गाडीला संपर्क केला जातो. यादरम्यान बराच वेळ जातो.————–महामार्गावर अनेक वेळा अपघात झाल्यानंतर १०८ ला संपर्क साधण्याचे प्रसंग आले. मात्र बहुतेक वेळा अनेकविध कारणांनी वेळेत मदत पोहोचत नाही. नुकताच २० हून अधिक वेळा कॉल केला. पण वेळेत मदत पोहोचली नाही. अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे यात सुधारणा होणे गरजेचे आहे.-सागर पुजारी, सामाजिक कार्यकर्ते———————टोल फ्री क्रमांकासाठी काही टेलिकॉम कंपन्याकडून समाधानकारक सेवा मिळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा अडचणी निर्माण होतात. संबंधित कंपन्यांना याबाबत कळवले आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. शिवाय कंपनीकडून रोजच्या रोज कॉलरचा फिडबॅक घेतला जातो. त्यामधून आलेल्या अडचणीचे वेळच्या वेळी निराकरण केले जाते. तरीही असे प्रसंग घडल्यास तक्रारदाराने परत संपर्क साधावा त्यात नक्कीच सुधारणा केली जाईल.-संग्राम मोरे,झोनल मॅनेजर, बीव्हीजी १०८