Source: Sakal Kolhapur
फोटो-00070……..
मालिका लोगो ः उद्योग क्षेत्राची वाटचाल ः भाग १
उद्योग ९६; गुंतवणूक १५०० कोटी—कोल्हापूरच्या अर्थचक्राला गती; विविध औद्योगिक वसाहतींमध्ये १५० भूखंडांचे वाटप लीड राज्याचे औद्योगिक क्षेत्र आणि अर्थकारणात भरीव योगदान देण्यात उद्योगनगरी असलेला कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे. फौंड्री ॲण्ड इंजिनिअरिंग, वस्त्रोद्योग, अन्नधान्य प्रक्रिया उद्योगात कोल्हापूरचा ठसा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करीत या उद्योग क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती दिली आहे. पाच वर्षांत कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राने केलेल्या वाटचालीचा आढावा घेणारी मालिका आजपासून…
संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. २ : कच्च्या मालाची दरवाढ, कोरोनाचा सामना करीत कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राने चांगली वाटचाल केली आहे. एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध ९६ उद्योगांच्या उभारणीतून सुमारे एक हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या उद्योगांच्या माध्यमातून चार हजार ८०० जणांच्या हाताला काम मिळाले आहे. कोरोनानंतर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात बचत करीत उद्योजकांनी वाटचाल केली. पारंपरिक उद्योग सांभाळत बहुतांश जणांनी इतर क्षेत्रांतील उद्योगांमध्ये नव्याने सुरुवात केली. ऑटोमोबाईल सेक्टरला लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीबरोबरच वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक साधनांच्या उत्पादन क्षेत्रात काही उद्योजकांनी प्रवेश केला. पाच वर्षांत शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित, आजरा, हलकर्णी, गडहिंग्लज या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांचा विस्तार आणि नव्याने उद्योग उभारणीसाठी एकूण २४६ भूखंडांचे वाटप झाले. त्यातून दोन हजार ९३६ कोटी १९ लाख रुपयांची गुंतवणूक आणि १२ हजार ३३ जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवून उद्योजक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) काम सुरू झाले. मात्र, कच्च्या मालाची सातत्याने झालेली दरवाढ आणि कोरोनाने त्यांच्या कामांची गदी मंदावली. त्यामुळे ९६ भूखंडांवरील उद्योग सुरू होनऊ त्यांच्या माध्यमातून एक हजार ५०० कोटींची गुंतवणूक झाली. आता दीड वर्षापासून उद्योजकांनी कोरोनाचा मळभ बाजूला सारून पावले टाकून जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला बऱ्यापैकी पूर्वपदावर आणले आहे. त्यामुळे उर्वरित १५० भूखंडांवरील उद्योग उभारणीच्या कामांनी गती घेतली आहे. …………चौकटएप्रिल २०१८ पासून वाटप केलेले भूखंडएमआयडीसी- वाटप केलेले भूखंड- अपेक्षित गुंतवणूक (कोटींमध्ये) कागल पंचतारांकित- १६१-२०३२गडहिंग्लज- ३९-२६.५२गोकुळ शिरगाव- १४-२१३.१३आजरा- १३-१.५६शिरोली- १०-१७६.४६हलकर्णी- ९-४८६.१९…………ग्राफ करणेएप्रिल २०१८ पासून झालेली रोजगार निर्मितीकागल पंचतारांकित- ८२५३गडहिंग्लज- ११८०गोकुळ शिरगाव- ९६२आजरा- ७२शिरोली- ७२३हलकर्णी- ८४३——-चौकटकामाचे प्रमाण वाढू लागलेनिर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या उद्योगांतील कामाचे (ऑर्डर) प्रमाण वाढू लागले आहे. सेमीकंडक्टर चीपचा पुरवठा होऊ लागल्याने वाहननिर्मिती उद्योगांची गती वाढत असून, त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांचे काम वाढत आहे. अर्थमूव्हींग, शुगर ॲण्ड फूड इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला लागणाऱ्या यंत्र, साधनांना चांगली मागणी आहे. ………..चौकट
विदेशी थेट गुंतवणुकींतर्गत आठ प्रकल्पकोल्हापूर जिल्ह्यात विदेशी थेट गुंतवणुकींतर्गत गेल्या १० वर्षांत एकूण आठ प्रकल्पांची उभारणी झाली. त्यात हातकणंगले, करवीर, चंदगड तालुक्यांत प्रत्येकी दोन, तर पन्हाळा, कागल तालुक्यांत प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. त्यातून सुमारे एक हजार ४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार इतक्या रोजगाराची निर्मिती झाली……..कोटऔद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने कोल्हापुरात चांगले वातावरण आणि क्षमता आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसायाच्या अनुषंगाने याठिकाणी गुंतवणूक आणि नवीन सुरुवात करण्यास कोल्हापूर उत्तम केंद्र आहे. गेल्या पाच वर्षांत झालेली उद्योग उभारणी, गुंतवणूक पाहता सकारात्मक चित्र आहे. त्यात वाढ करण्यासाठी उद्योजक, लोकप्रतिनिधींनी संघटितपणे काम करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज…….