कोल्हापूर : विविध नऊ प्रकारांमधील शिष्यवृत्तींच्या माध्यमातून कोल्हापूर विभागातील ४५,२५३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले आहे. त्यांना सन २०१९-२०२० मध्ये एकूण २५ कोटी ३९ लाख ४५ हजार ७८४ इतकी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण २२७ अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन दाखल केले. या अर्जांची पडताळणी करून परिपूर्ण अर्ज हे कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. अपूर्ण अर्जांतील त्रुटी कळवून ते संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आले. शासनाकडून अर्ज मंजूर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात आली. शिष्यवृत्ती मिळालेले सर्वाधिक ४४४६८ विद्यार्थी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतील आहेत. त्यापाठोपाठ डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजनेतील ६०७ विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे सन २०२०-२०२१ मध्ये महाडीबीटी पोर्टल उशिरा सुरू झाले असून, त्यावर आतापर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, एज्युकेशा कसिशा टू द चिल्ड्रा फ्रिडम फायटर, माजी सैनिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ४९ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
प्रतिक्रिया –
सध्या महाविद्यालयांचे फी ॲप्रोव्हल देण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालयांची महाडीबीटी पोर्टलची कार्यशाळा घेतली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज भरणे, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे, विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या वाढविणे, आदींबाबत सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत.
– डॉ. अशोक उबाळे, विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक
आकडेवारी दृष्टिक्षेपात
योजना विद्यार्थ्यांचे मंजूर अर्ज शासनाने विद्यार्थ्यांना वितरित केलेली रक्कम संस्था पातळीवरून विद्यार्थ्यांनी वितरित झालेली रक्कम
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती ४४४६८ ३,४७,१५,७७५ २१,८२,५६,९८९ असिस्टंट मेरोटिरीअस स्टुडंट स्कॉलरशिप
ज्युनिअर लेवल ५ ११८०० –
सीनिअर लेवल ४ ६६६०० –
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ६०७ ५,१८००० –
एकलव्य स्कॉलरशिप ८२ ३,७२,५०० –
माजी सैनिक शिष्यवृत्ती २४ ६० २५६०
गणित भौतिकशास्त्र शिष्यवृत्ती २ १५०० –
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती ७३ ३७०५० –
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ५१ – –
चौकट
१८१४ अर्ज परत पाठविले
विभागीय कार्यालयाकडून त्रुटी काढून महाविद्यालयांकडे १८१४ विद्यार्थ्यांचे अर्ज परत पाठविले आहेत. त्यात सर्वाधिक १६०४ अर्ज हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांचे आहेत.
.sponsored-poll{clear:both; margin-bottom: 20px; background:#f2f2f2; padding-bottom: 1px;} .sp-poll-head{background:#538ed5; color: #fff; padding:10px 20px; font-size: 20px; line-height: 25px; margin-bottom: 20px;} .sp-poll-widget{padding: 10px; margin: 0px 5px 5px; background:#e6e6e6; position: relative;} .sponsored-poll:after, .sp-poll-widget:after{content:”; display: block; clear: both;} .sp-poll-question{font-weight: 500;} .article-page .article-body p.sp-options{width: 100%; text-align: center; margin-bottom: 0px;} .sp-options span{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0 10px;} .sp-options span input,.sp-options span label{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0px; } .sp-options span input{margin-right: 5px;} .sp-options span.values{font-weight: bold;} .sp-poll-widget.poll-submitted:before{content: ”; display: block; position: absolute; left: 0; top: 0; right: 0; bottom: 0; z-index: 1; background:rgba(255,255,255,0.8);} .sp-options-mobile{display: none;} @media all and (max-width:767px){ .sp-poll-head{margin-bottom: 10px; padding: 5px 10px; font-size: 18px; line-height: 23px;} .article-content .article-contentText p.sp-options{width: 100%; display: table; margin-bottom: 5px;} .sp-options span input{margin-right: 2px;} .sp-options span{padding: 0px; margin:0px 5px; text-align: center; display: table-cell;} .sp-options span:first-of-type{margin-left: 0px; padding-left: 0px;} .sp-options span:last-of-type{margin-right: 0px;} .sp-options span.values{display: none;} .article-content .article-contentText p.sp-options-mobile{display: block; margin-bottom: 5px; padding: 0px 10px;} .sp-options-mobile .values{float:left; font-weight: bold; display: block; line-height: 20px;} .sp-options-mobile .values:nth-of-type(2){float:right;} .sp-options-mobile:after{display: block; content:”; clear: both;} } @media all and (max-width:320px){ .article-content .article-contentText p.sp-options-mobile{padding: 0px 5px;} } $(document).ready(function(){function a(a){var o=document.cookie.match(“(^|;) ?”+a+”=([^;]*)(;|$)”);return o?o[2]:null}function o(a,o){var t=new Date;t.setTime(t.getTime()+31536e6),document.cookie=a+”=”+o+”;expires=”+t.toUTCString()+”;path=/;domain=lokmat.com”}if(null==a(“survey2_status”)||null==a(“survey2_status”)){$(“.article-content p:last”).after(“