Source: Sakal Kolhapur
हे फोटो घेऊ नयेत ०००७४, ०००२०, ०००२१–00041/00042विकासाची गंगा गावांगावात पोहचवणार पालकमंत्री दीपक केसरकर; छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगला महाराष्ट्र दिन सोहळा
सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. १ ः महाराष्ट्राच्या विकासात शेतकरी आणि कामगार यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी शासनाने विविध योजना बनवल्या आहेत. विकासाची ही गंगा राज्य सरकार राज्यातील प्रत्येक गावात घेऊन जाणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग, कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आज शाहू स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या शासकीय समारंभ छत्रपती शाहू स्टेडियम येथे सकाळी ८ ते १० या वेळेत झाला. ध्वजवंदन, पोलिस दलाचे संचलन, विविध पुरस्कारांचे वितरण असे कार्यक्रमाचे स्वरुप होते. पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्य गीत म्हटले गेले. पोलिस दलातील विविध विभागांनी उत्कृष्ठ संचलन केले. पर्यवेक्षक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी संचलनाचे नेतृत्व केले. पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘ जिल्ह्यातील मधुमक्षिका पालन उद्योगाला चालना देण्यासाठी नाबार्डकडून कंपन्या बनवल्या आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. शाहूवाडी येथे नवी औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे तर हातकणंगले तालुक्यातील मजलेत ड्राय पोर्ट बनवले जाणार आहे. शाहू समाधीस्थळाच्या सुशोभिकऱणासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, जागेची अट शिथिल केली आहे. पन्हाळ्याचा बुरूज ढासळला होता त्याचे काम सुरू आहे. पन्हाळा किल्य्याची दुरूस्ती आणि सुशोभिकरण याचे कामही लवकरच सुरू होईल. शाहू मिल, शाहू स्मारक यांचे कामही लवकर सुरू करून पूर्ण होईल. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाला गती देणार आहे. कोटीतीर्थाची स्वच्छता पूर्ण झाली आहे. येथे शाहू महाराजांचा पुतळा उभारणार, डिझाईन मागवले आहेत. लवकरच काम सुरू होईल.’ जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. ————चौकटपोलिस महासंचालक पदक यावेळी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना महासंचालक पदक देण्यात आले. यामध्ये पोलिस उपअधिक्षक प्रविण पाटील, उपनिरीक्षक इक्बाल महात, जयगोंड हजारे, राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष माळी, दिवाकर होवाळे, हवालदार गोरक्ष माळी, नामदेव पाटील, सिताराम डामसे, संतोष पाटील, दयानंद कडूकर, जितेंद्र शिंदे, वैशाली पिसे, रणजित देसाई, संदिप काशीद यांचा समावेश आहे.————–चौकटहोमगार्डला आली चक्कर छत्रपती शाहू स्टेडियम येथे बंदोबस्तासाठी असणारे होमगार्ड संतोष कांबळे यांना कार्यक्रमादरम्यान भोवळ आली. त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये नेले. कार्यक्रमाच्या येथे रुग्णवाहिका होती. मात्र, चालक नसल्याने पोलिस जीपमधून कांबळे यांना उपचारासाठी नेले. पालकमंत्री केसरकर यांनी या सर्व घटनेची माहिती घेऊन कांबळे यांची विचारपूस केली. —————चौकटपोलिसांचे फोटे सेशनभाषणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक देणे सुरू असताना काही वरिष्ठ अधिकारी तेथे उजव्या बाजूला फोटे सेशन करत होते. आपल्या सहकाऱ्यांना गौरवण्यात येत असताना वरिष्ठांची ही कृती चर्चेचा विषय ठरली.