स्वयं रोजगार योजनांतून ३१ हजार जणांच्या हाताला काम

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

मालिका लोगोउद्योग क्षेत्राची वाटचाल ः भाग-२

३१ हजार जणांच्या हाताला कामस्वयंरोजगार योजना; जिल्ह्यात १४२० कोटींची गुंतवणूक, ४ हजार लाभार्थींना बळ

संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ३ ःजिल्हा उद्योग केंद्रातर्फे स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून २०१९ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार लाभार्थींना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास बळ मिळाले. त्यांच्या माध्यमातून १४२० कोटींची गुंतवणूक होवून ३१ हजार जणांच्या हाताला काम मिळाले आहे.या योजनांच्या माध्यमातून लाभार्थी युवक, युवतींनी गारमेंट, सर्व्हिस सेंटर, इंजिनिअरिंग वर्कशॉप, ट्रान्‍स्‍पोर्ट व्हेईकल, फूड अँड बेव्हरेज, सीएनसी अँड व्हीएमसी शॉप, मशीन शॉप, काजू प्रक्रिया, ग्राईडिंग मिल आदी उद्योग-व्यवसायांची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जिल्ह्यातील ३१ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योजकता तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ३५०० युवक-युवतींनी विविध उद्योग-व्यवसायांबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यात ब्युटी पार्लर, हार्डवेअर नेटवर्किंग, इनर्व्हटर दुरुस्ती, सीएनसी आणि व्हीएमसी मशीन आदी प्रशिक्षणांचा समावेश होता……..चौकटसात नवे क्लस्टर होणारजिल्ह्यात आजरा घनसाळ राईस क्लस्टर (आजरा), टेक्सटाईल क्लस्टर (रेंदाळ), फॅब्रिकेशन, गारमेंट क्लस्टर (कागल), टेक्सटाईल क्लस्टर (शिरोळ), सिल्व्हर क्लस्टर (हुपरी), मेटल प्रोसेसिंग क्लस्टर (कागल) पुढील दोन वर्षांत सुरू होणार आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये गारमेंट क्लस्टर (इचलकरंजी), कॉटन फॅब्रिक क्लस्टर (आळते), प्रिटिंग क्लस्टर (इचलकरंजी), काजू प्रक्रिया क्लस्टर (आजरा), टेक्सटाईल क्लस्टर (अब्दुललाट) सुरू झाले आहेत……..चौकटयोजनानिहाय चित्र योजना*लाभार्थी (शेकड्यात)*गुंतवणूक (कोटींमध्ये) रोजगारनिर्मिती (हजारांत)पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम*२४००*९६०*१९ हजारमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम*१२००*३६०*१० हजारबीजभांडवल योजना*४००*१००*२ हजार…….चौकटवर्षाला ४ हजार कोटींची निर्यातजिल्ह्यातील विविध उद्योग, व्यवसायांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४ हजार कोटींची निर्यात होते. त्यात वाहनांचे सुटे भाग, इंजिनिअरिंग, टेक्सटाईल, साखर, गूळ, आदींचा समावेश आहे. विदेशी व्यापार निगमच्या सहकार्याने जिल्ह्याचा निर्यात आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजक, व्यावसायिकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. पुढील तीन महिन्यांत आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे……ठळक चौकटयोजनांचे १० वर्षांतील तालुकानिहाय लाभार्थीतालुका*स्थानिक महामंडळे*विविध महामंडळेशाहूवाडी*३*६५पन्हाळा*१५*३६१हातकणंगले*२६*२६८शिरोळ*२३*१६०करवीर*४०*९५०गगनबावडा*१*१२राधानगरी*१७*१८७कागल*२०*३१५भुदरगड*१*१५०आजरा*१०*७८गडहिंग्लज*९*४८चंदगड*४*१२०एकूण*१६९*२७१४….कोटपंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बीजभांडवल व इतर योजनांच्या माध्यमातून नवयुवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीची संधी आहे. त्यांनी संबंधित योजनांचा लाभ घेऊन उद्योग, व्यवसायाची उभारणी करावी. विविध योजनांचा युवक-युवतींना लाभ देण्यात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.-सतीश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र…………जिल्हा नकाशा वापरणेजिल्हा उद्योग केंद्र कर्जयोजनेचे लाभार्थीशाहूवाडी-४२पन्हाळा-११७हातकणंगले-४२८शिरोळ-१८५करवीर-३८९गगनबावडा-५राधानगरी-११कागल-१०५भुदरगड-२आजरा-२२गडहिंग्लज-८६चंदगड-३२एकूण-१४२४

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: