Source: Sakal Kolhapur
02324पन्हाळा : कोल्हापूर जिल्हा ॲग्री डिप्लोमाधारक यांच्यातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात निवृत्त प्रा. गुरुवर्य संजय फडतरे सत्कार झाला.
कृषी पदविकाधारकांचा स्नेहमेळाव्यातशिरगाव : शालेय मैत्री जपण्यासाठी तसेच सुखदुःखात सहभागी होण्यासाठी गेट-टुगेदर सारखे उपक्रम राबवितात हे कौतुकास्पद आहे; असे प्रतिपादन जिल्हा कृषी विद्यालयाचे निवृत्त प्रा. संजय फडतरे यांनी केले. १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांनी पन्हाळा येथे घेतलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी पर्यवेक्षक तानाजी पाटील होते. ग्रामसेवक आर. के. पाटील, तानाजी पाटील, रघुनाथ कुंभार, जालंदर गिरीगोसावी, उद्योगपती संभाजीराव पाटील, उद्योजक उत्तम मोरे, अजित कोठावळे प्रमुख उपस्थित होते. कृष्णात ढवण यांनी स्वागत केले. महादेव ताकमारे यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ बुरुड, रमेश पाटील, कपूर कांबळे, प्राचार्य नामदेव पाटील, कृष्णात पाटील यांच्या हस्ते प्रा. संजय फडतरे यांचा सत्कार झाला. सदस्य मधुकर किरुळकर, आदर्श कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महादेव ताकमारे, उत्तम मोरे, आर. टी. पाटील, आर. के. पाटील, टी. के. पाटील यांना पुरस्कार व पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला. रमेश पाटील यांनी मराठी-हिंदी गाणी सादर केली. ढवण यांनी आभार मानले.