Source: Sakal Kolhapur
सेनापती कापशी शाळेत ई-लर्निंग सुविधासेनापती कापशी : येथील सेनापती विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ समिती यांच्यातर्फे ई-लर्निंग सुविधा प्रदान करण्यात आली. या वेळी श्रेयादेवी घाटगे म्हणाल्या, ‘‘शिक्षक आणि शाळा यांना राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ समितीचे पाठबळ कायम राहील. ई-लर्निंग सुविधेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अद्यावत घडामोडी आणि ज्ञान मिळण्यास मदत होईल.’’ या वेळी उमेश देसाई, दयानंद घोरपडे, मकरंद कोळी, शिबिराज शिऊडकर, सचिन मगदूम, सुनील रणनवरे, मुख्याध्यापक प्रदीप आवळेकर आदी उपस्थित होते. तुकाराम भारमल यांनी स्वागत केले. रमेश कदम यांनी आभार मानले.