Source: Sakal Kolhapur
00149कोल्हापूर ः सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टतर्फे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित सदस्य व पदाधिकारी.
सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टतर्फेव्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमकोल्हापूर ः सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, कोल्हापूर चॅप्टरची उद्योजक आणि व्यावसायिक यांना मार्गदर्शन करणारी बैठक रोटरी समाज सेवा केंद्र नागाळा पार्क येथे झाली. उद्योजक व ‘स्मॅक’चे संचालक अमर जाधव प्रमुख उपस्थित होते. जाधव यांनी व्यवसाय कसा करावा? रिस्क घ्यावी का?, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत व्यवसाय कसा वाढवावा? आदींबाबत मार्गदर्शन केले. कृष्णा जाधव, रीजन हेड विशाल मंडलिक, कोल्हापूर चॅप्टरचे पिराजी पाटील, सचिव सिद्धेश मोहिते, ट्रेजरर पूनम शहा आदी उपस्थित होते. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा नवीन चॅप्टर दख्खन हा लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी इच्छुक व्यवसायधारकांनी संपर्क साधावा, असे आवाहन विशाल मंडलिक यांनी केले.