Source: Sakal Kolhapur
दोनवडेतील एकाची आत्महत्या
कोल्हापूर ः दोनवडे (ता.करवीर) येथील एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. महादेव दत्तू पाटील (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. जनावरांच्या गोठ्यात त्यांनी आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.