Source: Sakal Kolhapur
सावली आज होणार अदृश्य कोल्हापूर, ता. ४ : असं म्हटलं जात की आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही. मात्र, उद्या (ता. ५) दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदांपासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत ५० सेकंदांपर्यंत आपली सावली अदृश्य होणार आहे. खगोल शास्त्रामध्ये या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असे म्हटले जाते. कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा आनंद घेता येतो. मात्र जे लोक कर्क वृत्त, मकर वृत्त आणि विषुव वृत्त या ठिकाणी राहतात त्यांना वर्षातून एकदाच शून्य सावलीचा आनंद घेता येतो. कर्क वृत्त व विषुववृत्त या दोन स्थानांमध्ये सूर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखांवृत्तावरती पडतील. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या जागांवरती काही सेकंदाकरीता आपली सावली काही ठराविक वेळी काही सेकंदाकरीता अदृश्य होते. कोल्हापूर हे एक त्यापैकी असणाऱ्या जागेवरती येत असल्याने सूर्याच्या उतरायान काळ खंडामध्ये शुक्रवारी (ता. ५) दुपारी ५० सेकंदापर्यंत आपली सावली अदृश्य झाल्याचे अनुभता येणार आहे. सूर्याच्या दक्षिणायन काळात ६ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा शून्य सावली अनुभवता येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.