fbpx
Site logo

सायकल चालवणं की पायी चालणं, गुडघ्यांच्या मजबूतीसाठी काय फायदेशीर?

Facebook
LinkedIn
WhatsApp
Knees Health: आज आम्ही सांगणार आहोत की, गुडघ्यांच्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं.

Source: Lokmat Health

Knees Health: सायकल चालवणं आणि पायी चालणं शरीर फिट ठेवण्याच्या दोन लोकप्रिय क्रिया आहेत. या दोन्हीमुळे हृदय चांगलं राहतं, वजन कंट्रोल राहतं आणि मेंटल हेल्थही चांगली राहते. पण जेव्हा गुडघ्यांच्या समस्येबाबत विषय निघतो तेव्हा लोकांना समजत नाही की, दोनपैकी कोणता वर्कआउट गुडघ्यांसाठी चांगला ठरू शकतो. दोन्ही वर्कआउटमध्ये आपापले वेगवेगळे गुण आहेत. यातील एकाची निवड करणं हे परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असते. आज आम्ही सांगणार आहोत की, गुडघ्यांच्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं.

सायकल चालवणं

जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमचे पाय पॅडलच्या संपर्कात राहतात, यावेळी जी क्रिया होते तेव्हा गुडघ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, सायकल चालवल्याने तुमच्या गुडघ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. 

क्लिनिकल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित 2021 च्या अॅनालिलिसनुसार, सायकल चालवल्याने गुडघ्यांची जुनी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या दूर होऊ शकते आणि गुडघ्यांचं कामही सुधारतं. 

पायी चालणं 

पायी चालणं हा व्यायामाचा एक नैसर्गिक आणि सोपा प्रकार आहे. ज्यामुळे गुडघ्याचं आरोग्य सुधारतं. याने जॉइंटमधील लवचिकपणा कायम राहण्यास मदत मिळते. गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत होतात आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पायी चालल्याने गुडघ्याच्या जॉइंटमध्ये चांगलं सर्कुलेशन होतं आणि लवचिकता वाढते. तसेच पायी चालल्याने हाडांचं आरोग्यही चांगलं राहतं. 

सायकल चालवणं जास्त फायदेशीर की पायी चालणं?

गुडघे मजबूत करण्यासाठी सायकल चालवणं किंवा पायी चालणं दोन्हीही फायदेशीर असतं. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना असेल तर पायी चालणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमचे गुडघे निरोगी आणि फिट आहेत तर सायकल चालवणंही फायदेशीर ठरू शकतं. नियमितपणे व्यायाम करणं गुडघ्यांच्या मजबुतीसाठी महत्वाचं आहे. 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: