fbpx
Site logo

साखर हंगाम

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

फाईल फोटो…साखर हंगाम १ नोव्हेंबरपासूनच सोयीचा

कारखानदारांचे मत ः पावसाअभावी ऊस उत्पादनात घट शक्य

सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ ः यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने दिलेली ओढ, त्यामुळे घटणारे उसाचे उत्पादन आणि राज्यात सुरू झालेल्या गूळ पावडर, खांडसरी व गुऱ्हाळघरांचा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारा हंगाम लक्षात घेता यावर्षी साखर कारखाने १ नोव्हेंबरपासूनच सुरू होणे सोयीचे ठरणार असल्याचे मत साखर कारखानदारांनी व्यक्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व खानदेशातील एकंदरीत ऊस उत्पादनाची परिस्थितीची पाहिल्यास काही भागात पावसाचे प्रमाण फारच कमी, काही भागात मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी बऱ्यापैकी असे आहे. त्यामुळे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन घटणार आहे. शिवाय साखर उताऱ्यावरही त्याचा परिणाम हेाणार आहे. प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारा उजनी प्रकल्प व मराठवाड्याची जीवन वाहिनी असणारा जायकवाडी प्रकल्प दहा-बारा टक्क्यापर्यंत सुद्धा भरले नाहीत. त्यामुळे सोलापूर, पुणे, नगर, नाशिकसह मराठवाडा व खानदेशातील उसाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्यातील उसाचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. ऊस वाळत असल्याने शेतकरी येईल त्यांना ऊस देण्याचा प्रयत्न करीत असतात. अपरिपक्व उसामध्ये पाण्याचे प्रमाण जादा असल्याने त्याचा परिणाम उसाचे वजन कमी भरण्यामध्येही होतो. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्याचा फटका बसतो. यावर्षी दिवाळी सण १४ नेाव्हेंबरला सुरू होत आहे. तत्पूर्वी दहा-पंधरा दिवस गाळप हंगाम सुरू करणे गरजेचे आहे. म्हणजे ऊस तोडणी-ओढणी यंत्रणा कारखान्यांच्याकडे तीन-चार दिवस आगावू हजर होण्यास सुरवात होते. दिवाळीनंतर कारखाने सुरू करण्याचे ठरविल्यास संपूर्ण यंत्रणा हजर होण्यास २५ नोव्हेंबरचा दिवस उजाडेल. या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा साखर हंगाम १ नोव्हेंबरपासूनच सुरू होणे संयुक्तिक होणार असल्याचे कारखानदारांचे मत आहे. …

‘पावसाअभावी राज्यातील ऊस पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. कर्नाटकात १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील उसाची उपलब्धता, खुंटलेली वाढ पाहता हंगाम १ नोव्हेंबरपासूनच सुरू व्हायला पाहिजे. मंत्री समितीच्या बैठकीत तसा निर्णय अपेक्षित आहे. पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: